परळी विधानसभेची जागा शिवसेना लढणार, पक्षनिरीक्षक साबणे यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 19:41 IST2018-02-21T19:39:43+5:302018-02-21T19:41:45+5:30
शिवसेना परळी विधानसभेची जागा लढणार असल्याची माहिती पक्षनिरीक्षक आमदार सुभाष साबणे यांनी दिली. ते शिवसंपर्क मोहिमेनिमित्त आयोजित आढावा बैठकीत बोलत होते.

परळी विधानसभेची जागा शिवसेना लढणार, पक्षनिरीक्षक साबणे यांची माहिती
परळी (बीड ) : शिवसेना परळी विधानसभेची जागा लढणार असल्याची माहिती पक्षनिरीक्षक आमदार सुभाष साबणे यांनी आज दुपारी दिली. ते शिवसंपर्क मोहिमेनिमित्त आयोजित आढावा बैठकीत बोलत होते.
सध्या शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्रभर शिवसंपर्क मोहीम राबवण्यात येत आहे. या विषयी आढावा घेण्यासाठी आज शहरात बैठक आयोजित करण्यात आली होती. यात शिवसेना येणाऱ्या निवडणुकीला कशा प्रकारे सामोरे जाणार याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना आमदार साबणे म्हणाले कि, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना परळी विधानसभेची निवडणूक लढणार असल्याचा संदेश दिला आहे. यामुळे आपण तयारीला लागावे.
यासोबतच आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना विरोधकांना हाबडा देणार असा विश्वास जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी यावेळी व्यक्त केला. बैठकीला शिवसेनेचे शहर व ग्रामीण भागातील आजी माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.