शिवसंपर्क अभियान - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:21 IST2021-07-12T04:21:24+5:302021-07-12T04:21:24+5:30
माजलगाव : शिवसंपर्क अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबविणार, असे प्रतिपादन बीड जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केले. माजलगाव, वडवणी, धारूर, ...

शिवसंपर्क अभियान - A
माजलगाव : शिवसंपर्क अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबविणार, असे प्रतिपादन बीड जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केले. माजलगाव, वडवणी, धारूर, परळी, अंबाजोगाई, केज येथील सर्व शिवसैनिकांना संदेश देताना ते बोलत होते.
महाराष्ट्रात मराठी माणसाचा स्वाभिमान जागा करत शिवसेनेने मराठी मातीतील माणसाला एकत्र करण्यासाठी शिवसंपर्क अभियान दि. १२ ते २४ जुलैदरम्यान आयोजित केले आहे. शिवसैनिकांनी हे अभियान प्रभावीपणे राबवावे, असे आवाहन जाधव यांनी माजलगाव येथे बैठकीत बोलताना केले. महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगली कामगिरी महाराष्ट्र सरकार करत आहे, बेरोजगारांसाठी नवीन नोकरभरती, शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना, विद्यार्थ्यांना शैक्षणिक विकासाबरोबरच आरोग्यदायी जीवन मिळावे यासाठी अथक परिश्रम करून शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ न देता ज्ञान पोहोचण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुले आरोग्य योजनेद्वारे आरोग्याचे प्रश्न सोडवणे, तसेच सर्वसामान्य माणसांना चांगले जीवन जगता यावे यासाठी विविध प्रकारे मदत सरकार करत आहे. या सर्व योजनांची आणि कामांची माहिती सामान्यांपर्यंत घेऊन जाण्यासाठी हे शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे, असे ते म्हणाले.
याप्रसंगी जिल्हा समन्वयक संजय महाद्वार, उपजिल्हाप्रमुख रामराजे सोळंके, शिवाजी कुलकर्णी, पप्पू ठक्कर, जिल्हा संघटक रामदास ढगे, अशोक गाढवे, विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख अतुल दुबे, नगरसेवक अशोक आळणे, तालुकाप्रमुख रत्नाकर शिंदे, व्यंकटेश शिंदे, संदीप माने, अर्जुन वाघमारे, बाळासाहेब कुरुंद, अनिल बडे, गजानन मुडेगावकर, धनंजय पापा सोळंके यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
100721\0942purusttam karva_img-20210710-wa0099_14.jpg