सिद्धेश्वर महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:02 IST2021-02-21T05:02:02+5:302021-02-21T05:02:02+5:30

माजलगाव : येथील सिद्धेश्वर महाविद्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विकास बोरगावकर ...

Shiv Jayanti celebrations at Siddheshwar College - A | सिद्धेश्वर महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात - A

सिद्धेश्वर महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात - A

माजलगाव : येथील सिद्धेश्वर महाविद्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विकास बोरगावकर तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभय कोकड, साक्षी येवले उपस्थित होते.

यावेळी डॉ. बोरगावकर म्हणाले, शिवाजी महाराजांची युद्धनीती सर्वांनाच प्रेरणादायी आहे. त्यांना राजमाता जिजाऊ यांनी सतत हिंदवी स्वराज्य उभारणीची प्रेरणा दिल्याचेही त्यांनी सांगितले. युवा कीर्तनकार साक्षी येवले हिने शिवाजी महाराजांचे कर्तृत्व आणि स्वराज्य उभारणी याचे वर्णन केले, तसेच ‘मुजरा मानाचा या जिजाईला’ हे गीत गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

अध्यक्षीय समारोप महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष अभय कोकड यांनी केला. प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. गजानन होन्ना यांनी केले. सूत्रसंचालन बालाजी बुधनर याने केले तर साक्षी खुर्पे हिने आभार मानले. सामूहिक पसायदान नेहा शेख, साक्षी मोगरेकर यांनी सादर केले.

Web Title: Shiv Jayanti celebrations at Siddheshwar College - A