शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा ‘शिमगा’, खंडित वीज पुरवठा झाला सुरळीत;पण शॉर्टसर्किटने १५० एकर उसाची होळी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 12:51 IST

३० ते ४० शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी

केज/बनसारोळा : केज तालुक्यातील सौंदाना गावच्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचा खंडित करण्यात आलेला वीज पुरवठा बुधवारी पूर्ववत करण्यात आला खरा; परंतु सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विद्युत तारांचे घर्षण होऊन (शॉर्टसर्किट) उडालेल्या ठिणगीने तब्बल १५० एकरांवरील उसाची अक्षरश: होळी झाली. या अग्नितांडवात ३० ते ४० शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे गावकऱ्यांनी महावितरणच्या नावाने ‘शिमगा’ केला.

सौंदाना गावातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचा विद्युत पुरवठा थकीत वीज बिलापोटी खंडित करण्यात आला होता. काही शेतकऱ्यांनी थकबाकी भरल्यानंतर बुधवारी विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र, अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विद्युत तारांचे घर्षण होऊन (शॉर्टसर्किट) ठिणग्या उडाल्या. उसाच्या फडातील पाचटीने पेट घेतल्याने फडच्या फड वाऱ्याच्या वेगाने एकामागून एक पेटत गेले. वाऱ्याचा वेगच इतका होता की, सौंदाना शिवारात बघताबघता आगडोंब उसळला. केजहून अग्निशामक दलाची गाडी मागविण्यापूर्वीच १५० एकरांवरील उसाची राखरांगोळी झाली. आगीने रौद्र रूप धारण करीत सौंदाना-बनसारोळा रस्त्यालगतच्या दोन्ही बाजूचा ऊस खाक झाला.

कारखान्यांनी ऊसतोड वेळेवर न केल्याने नुकसानया आगीत ३० ते ४० शेतकऱ्यांचा दीडशे एकर ऊस जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. साखर कारखान्यांनी ऊसतोड वेळेवर न केल्याने, तसेच महावितरणने वीज तारा व्यवस्थित न बसविल्याने हे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

सर्वकाही संपले...या आगीत जगन्नाथ नांदुरे, रमेश भिसे, रुक्मिण भिसे, गणेश भिसे, स्वाती भिसे, राजामती भिसे, प्रदीप भिसे, नरसू भिसे, सूर्यकांत नांदुरे, अशोक नांदुरे, रूपाबाई दहिरे, शहाजी भिसे, महादेव चव्हाण, आदी ३० ते ४० शेतकऱ्यांचा १५० एकर ऊस आगीत जळून खाक झाला. उसासोबत ठिबक संचही जळाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीBeedबीड