शिंपेटाकळीत १६ वासरे तडफडून दगावली

By Admin | Updated: December 29, 2014 00:57 IST2014-12-29T00:37:15+5:302014-12-29T00:57:57+5:30

गंगामसला : माजलगाव तालुक्यातील शिंपेटाकळी येथे अज्ञात आजाराने १६ वासरे तडफडून दगावली़ ही खळबळजनक घटना रविवारी उघडकीस आली़

In the Shimetakala, 16 calves broke down | शिंपेटाकळीत १६ वासरे तडफडून दगावली

शिंपेटाकळीत १६ वासरे तडफडून दगावली


गंगामसला : माजलगाव तालुक्यातील शिंपेटाकळी येथे अज्ञात आजाराने १६ वासरे तडफडून दगावली़ ही खळबळजनक घटना रविवारी उघडकीस आली़
शिंपेटाकळी परिसरात पशुपालक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे़ शिंपेटाकळी येथे शुक्रवारी रात्रीपासून गुरे दगावण्यास सुरूवात झाली़ रविवारपर्यंत हा आकडा १६ पर्यंत पोहचला़ गुरे दगावण्याचे नेमके कारण समजू शकले नाही़ दगावण्यापूर्वी वासरांना कुठला आजारही जडलेला नव्हता़ असे असतानाही अचानक वासरे दगावली कशी ? या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे़
दरम्यान, शेतकऱ्यांनी सांगितले की, मोठी गुरे सुरक्षित आहेत परंतु वासरे दगावल्याने मोठे नुकसान झाले आहे़ दुष्काळी स्थितीमुळे गुरांना जगविण्यासाठी कसरत होत आहे़ त्यात अज्ञात कारणावरून वासरे दगावल्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत़ (वार्ताहर)

Web Title: In the Shimetakala, 16 calves broke down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.