बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूकबधिरांचे शिट्टीनाद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 00:57 IST2017-12-12T00:57:00+5:302017-12-12T00:57:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : येथील मूक-कर्णबधिरांच्या विविध हक्क व मागण्यांसाठी बीड जिल्हा मूक-बधिर असोसिएशनतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिट्टीनाद ...

बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूकबधिरांचे शिट्टीनाद आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : येथील मूक-कर्णबधिरांच्या विविध हक्क व मागण्यांसाठी बीड जिल्हा मूक-बधिर असोसिएशनतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिट्टीनाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाने प्रशासनासह जनतेचे लक्ष वेधले.
१०० टक्के मूकबधिर व्यक्तींची शासन अधिनियम १९९५ (१९९६ चा १) नुसार त्वरित शासकीय नोकरीत नियुक्ती करावी, १०० टक्के मूकबधिर बेरोजगारांना राज्य व केंद्र शासनाकडून भत्ता सुरु करावा, ाासन सेवा योजना मोजणी अंतर्गत मूक- कर्णबधिरांची नोंदणी त्वरति करावी, शासन जाहिरातींमधून अंशत: ४० टक्के अपंग मूक कर्णबधिर रद्द करावेत, बोगस प्रमाणपत्र धारकांवर कायदेशीर कारवाई करावी, १०० टक्के मूकबधिरांना शासकीय नोकरीसाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा ४५ वर्ष करावी आदी मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.
या आंदोलनात आवाहन जिल्हा मूकबधिर असोसिएशनचे अध्यक्ष मोहंमद अब्दुल हई, अण्णा कापरे, अब्दुल जावेद पठाण, पठाण अमरजान, नरेंद्र गायकवाड, मोहन मातदकर, बाबाराया तिडके, श्रीकांत शर्मा, फिरोज पठाण आदींनी सहभाग नोंदविला.