स्मशानभूमीत शेड उभारावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:22 IST2021-06-23T04:22:39+5:302021-06-23T04:22:39+5:30
नवीन वसाहतींमध्ये सुविधा मिळाव्यात अंबाजोगाई : शहराच्या चारही बाजूंनी नवीन वसाहती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मात्र या वसाहतींमध्ये मूलभूत ...

स्मशानभूमीत शेड उभारावेत
नवीन वसाहतींमध्ये सुविधा मिळाव्यात
अंबाजोगाई : शहराच्या चारही बाजूंनी नवीन वसाहती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मात्र या वसाहतींमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. काही वसाहती नगरपालिका तर काही वसाहती ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येतात. या वसाहतींमध्ये मुख्य समस्या रस्त्यांची असून पावसाळ्यात रस्त्याअभावी ये-जा करण्यासाठी नागरिकांचे हाल होतात.
रस्त्यांबरोबरच वीज, पाणी, गटारी, आदी मूलभूत सुविधाही उपलब्ध करून देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ देशमुख यांनी केली आहे.
पावसाळ्यापूर्वी फवारणी करावी
अंबाजोगाई : कोरोनाचा उद्रेक कमी झाला असला तरी ग्रामीण भागात स्थानिक ग्रामपंचायतींनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात विविध साथीचे आजार डोके वर काढतात. तसेच पावसामुळे दलदल निर्माण होऊन डास-मच्छरांचा उपद्रवही वाढतो. त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. पावसाळ्यापूर्वी आरोग्य विभाग व ग्रामपंचायतींनी औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यामुळे पावसाळ्यात निर्माण होणारा आरोग्याचा प्रश्न काही अंशी सुटणार आहे.
रोहित्र बनले धोकादायक
वडवणी : शहरातील तसेच ग्रामीण भागातील गावांना वीजपुरवठा करणाऱ्या विद्युतवाहिन्या व रोहित्र उघडे असल्याने धोकादायक बनले आहेत. रोहित्राचे दरवाजे नसल्याने केबल जमिनीवर पसरले आहे. पावसाळ्यापूर्वी महावितरणने विद्युतकामे करणे आवश्यक बनले आहे.
पुलांची उंची वाढवा
कडा : आष्टी तालुक्यातील धानोरा ते सावरगावदरम्यान रस्त्यावर अनेक ठिकाणी नदी, ओढे आहेत. या नदी, ओढ्यांवर पूल आहेत. परंतु ते कमी उंचीचे आहेत. पावसाळ्यात या पुलावरून अनेक वेळा पाणी वाहते. यामुळे अपघात घडतात. तरी या पुलांची उंची वाढवावी, अशी मागणी होत आहे.
जनावरांना लसीकरण करावे
आष्टी : पावसाळा सुरू झाला आहे. यामुळे जनावरांमध्ये घटसर्प, लाळखुरकत यासारख्या साथरोगांची लक्षणे तालुक्यात आढळून येत आहेत. यामुळे काही जनावरे दगावलीे आहेत. तरी पशुसंवर्धन विभागाने गावोगावी जनावरांसाठी लसीकरण मोहीम सुरू करावी, अशी मागणी होत आहे.