केज तालुक्यात विवाहितेवर सामुहिक बलात्कार; आरोपी अटकेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 05:52 PM2018-10-16T17:52:47+5:302018-10-16T17:54:21+5:30

माळेगाव येथील सत्तावीस वर्षीय विवाहितेवर तीन जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना सोमवारी रात्री अकराच्या सुमारास घडली.

Sexual assault on Married women in Kaij taluka; Attempted accused | केज तालुक्यात विवाहितेवर सामुहिक बलात्कार; आरोपी अटकेत 

केज तालुक्यात विवाहितेवर सामुहिक बलात्कार; आरोपी अटकेत 

Next

केज (बीड ) : तालुक्यातील माळेगाव येथील सत्तावीस वर्षीय विवाहितेवर तीन जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना सोमवारी (दि.१५) रात्री अकराच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. 

माळेगाव येथील विवाहीता सोमवारी काही कामानिमित्त केज येथे आल्या होत्या. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्या शिवाजी चौक येथे गाडीची वाट पाहत उभ्या होत्या. याच दरम्यान साळेगाव येथील परिचित दत्ता बाबासाहेब तोंडे हा एका चारचाकीत (एमएच १५ सीआर-७२२७ ) तेथे आला. यावेळी त्याच्या सोबत साळेगाव येथील त्याचा मित्र मधुकर गोरोबा इंगळे व कार चालक आझीम मुस्ताक फारुख होते. 

दत्ता तोंडे याने विवाहितेस,"मी कामानिमित्त कळंबला चाललो आहे, तुम्हाला माळेगावला सोडतो" असे म्हणत गाडीत बसवले. वाटेत गाडी एका धाब्यावर थांबवून तिघांनीही मद्यप्राशन केले. त्यानंतर महिलेस माळेगाव येथे न सोडता त्यांनी गाडी अंबाजोगाई रोडवर नेली. येथे तोंडे याने गाडीत विवाहितेवर अत्याचार केला. यानंतर इतर दोघांनीही महिलेवर अत्याचार करत तिला तिथेच सोडले. 

पीडित महिला यानंतर कशीबशी घरी गेली. यानंतर तिने युसूफवडगाव पोलिस ठाण्यात जाऊन घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास सुरु केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद झोटे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली. पिडीत महिलेच्या तक्रारीवरून आरोपी दत्ता बाबासाहेब तोंडे, मधुकर गोरोबा इंगळे व कार चालक आझीम मुस्ताक फारुख यांच्या विरोधात युसुफवडगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सुनील अंधारे हे करत आहेत.

Web Title: Sexual assault on Married women in Kaij taluka; Attempted accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.