कऱ्हेवाडीत दिवसा सात घरफोड्या - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:36 IST2021-09-18T04:36:09+5:302021-09-18T04:36:09+5:30

आष्टी : तालुक्यातील कऱ्हेवाडी येथे भरदिवसा सात घरांत डल्ला मारून चोरट्यांनी २१ तोळे दागिन्यांसह एक लाखाची रोकड लंपास केली. ...

Seven burglaries a day in Karhewadi - A | कऱ्हेवाडीत दिवसा सात घरफोड्या - A

कऱ्हेवाडीत दिवसा सात घरफोड्या - A

आष्टी : तालुक्यातील कऱ्हेवाडी येथे भरदिवसा सात घरांत डल्ला मारून चोरट्यांनी २१ तोळे दागिन्यांसह एक लाखाची रोकड लंपास केली. १६ सप्टेंबर रोजी ही घटना घडली असून, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कऱ्हेवाडी व परिसरात सध्या कांदा लागवड जोमाने सुरू आहे. त्यामुळे शेतकरी सकाळीच घरे बंद करून शेतात जातात. याचा फायदा घेत १६ सप्टेंबर रोजी

दुपारी २ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी ओळीने सात घरांचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश करत मुद्देमाल लांबविला दिलीप नाना सांगळे यांच्या घरातील १५ तोळे सोने व ८० हजार रुपये,कचराबाई जगन्नाथ सांगळे ३ तोळे, उत्तम रघुनाथ सांगळे ९ हजार रुपये ३ तोळे, कल्याण आश्रुबा सांगळे रोकड १५ हजार, ६ ग्रॅम सोने, चंदर यदू सांगळे ११ हजार रुपये असा एकूण २१ तोळे ६ ग्रॅम दागिने व १ लाख १५ हजार रुपयांची रोकड लंपास केली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Seven burglaries a day in Karhewadi - A