सेरो सर्वे, दहा गावांतून घेतले ४०० रक्त नमुने - फोटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:24 IST2020-12-27T04:24:33+5:302020-12-27T04:24:33+5:30
जिल्ह्यात यापूर्वी दोन वेळा सेरो सर्वेक्षण झालेले आहे. यात पहिल्या टप्यात ४०० रक्त नमुणे तपासले होते. यात ४ पॉझिटिव्ह ...

सेरो सर्वे, दहा गावांतून घेतले ४०० रक्त नमुने - फोटो
जिल्ह्यात यापूर्वी दोन वेळा सेरो सर्वेक्षण झालेले आहे. यात पहिल्या टप्यात ४०० रक्त नमुणे तपासले होते. यात ४ पॉझिटिव्ह आले होते. तर दुसऱ्या टप्यात ४४३ रक्त नमुणे तपासले असता त्यात ३३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आता तिसऱ्या टप्यातील रक्त नमुणे घेण्यासाठी शनिवारी आयसीएमआरचे पथक बीड जिल्ह्यात आले होते. यात त्यांनी हिंगणी, पांगरी, आमला, टालेवाडी, पिंपळनेर, चंदनसावरगाव, मोहा, नांदगाव, बीड शहरातील वॉर्ड क्र.२३, परळी शहरातील वॉर्ड क्र. ३० येथील लोकांचे जवळपास ४०० रक्त नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. तसेच परळी उपजिल्हा रुग्णालयासह नागापूर, मोहा, सिरसाळा, पोहनेर येथील आरोग्य केंद्रांतील १०० कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. डॉ.बाबासाहेब ढाकणे यांनी जिल्ह्यात आलेल्या पथकासोबत समन्वय साधण्याचे काम केले.