देवळालीत डाळिंब पिकावर परिसंवाद - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:35 IST2021-02-11T04:35:48+5:302021-02-11T04:35:48+5:30

यावेळी बाबासाहेब गोरे यांनी शास्त्रीय पद्धतीने डाळिंब पीक व्यवस्थापनावर मार्गदर्शन करून सेंद्रिय औषधांचे उपयोग सांगितले. तालुका कृषी अधिकारी ...

Seminar on pomegranate crop in Deolali - A | देवळालीत डाळिंब पिकावर परिसंवाद - A

देवळालीत डाळिंब पिकावर परिसंवाद - A

यावेळी बाबासाहेब गोरे यांनी शास्त्रीय पद्धतीने डाळिंब पीक व्यवस्थापनावर मार्गदर्शन करून सेंद्रिय औषधांचे उपयोग सांगितले. तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती दिली. मृदा व जल परीक्षण काळाची गरज असल्याचे ते म्हणाले. बाबूलाल भंडारी यांनी श्री. अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ शतक महोत्सवात पदार्पण करणारी जिल्ह्यातील एकमेव जैन अल्पसंख्यांक संस्था असल्याचे सांगितले. प्रास्ताविकात प्रा. डॉ. विशाल वैद्य यांनी सेंद्रिय शेती, गांडूळ खत प्रकल्प, सुधारित बियाणे तंत्रज्ञान, एकात्मिक कीड नियोजनाविषयी माहिती दिली. प्राचार्य डॉ.नंदकुमार राठी यांनी वसुंधरा संवर्धन काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी मास्क व गुलाब पुष्प देऊन शेतकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रा.डॉ.चंद्रशेखर तळेकर, प्रा.डॉ.रमेश आबदार, अशोक खाडे, प्रा.गवळी एन.टी, प्रा.डॉ. जाधवर पी. बी., प्रा. हासे एस.आर व प्रा.डॉ. शिंदे एस.एम. यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन प्रा.डॉ.सुदाम जाधव यांनी केले. सुनील खाडे यांनी आभार मानले. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा पर्यावरणपूरक उपक्रम महाविद्यालयाने अंगीकृत करण्यासाठी श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कांतीलाल चाणोदिया, विश्वस्त अध्यक्ष गोकुळदास मेहेर, कार्याध्यक्ष योगेशकुमार भंडारी, सचिव हेमंतकुमार पोखरणा, उपाध्यक्ष रमेशलाल गुगळे व अनिलकुमार झाडमुथ्था, मंत्री बिपीनकुमार भंडारी, विनोद बलदोटा, कोषाध्यक्ष डॉ.उमेश गांधी, तसेच सर्व पदाधिकारी, सदस्य, विश्वस्त व कार्यकारी मंडळांनी प्रोत्साहन दिले.

Web Title: Seminar on pomegranate crop in Deolali - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.