सौ.के.एस.के.महाविद्यालयात नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:48 IST2021-01-08T05:48:24+5:302021-01-08T05:48:24+5:30
डॉ. सतीश पावडे यांनी दिग्दर्शक व त्याची कार्यपद्धती यावर ज्ञानवर्धक, उपयुक्त मार्गदर्शन केले. दिग्दर्शक, नाटकाचे पृथकरण, नाट्यनिर्मितीची प्रक्रिया यावर ...

सौ.के.एस.के.महाविद्यालयात नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने चर्चासत्र
डॉ. सतीश पावडे यांनी दिग्दर्शक व त्याची कार्यपद्धती यावर ज्ञानवर्धक, उपयुक्त मार्गदर्शन केले. दिग्दर्शक, नाटकाचे पृथकरण, नाट्यनिर्मितीची प्रक्रिया यावर भाष्य केले. डॉ. जयंत शेवतेकर यांनी ‘अभिनय आणि रससिद्धांत’ या विषयावर मार्गदर्शन करताना भूमिका या शब्दाचा विग्रह करून अभिनय म्हणजे काय ? भूमिका जगणे, भूमिकेत समरस होणे, रसनिष्पत्ती,नाट्योत्पतीत रसाचे महत्त्व आणि रससिद्धांत यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक प्राचार्या डॉ. दीपा क्षीरसागर यांनी केले तर उपप्राचार्य डॉ. आबासाहेब हांगे यांनीही मार्गदर्शनपर विचार मांडले. संयोजन, सूत्रसंचालन, आभार डॉ. दुष्यंता रामटेके यांनी केले. तांत्रिक बाजू वाणिज्य विभागप्रमुख प्रमुख डॉ. सिद्धार्थ जाधव यांनी सांभाळली. चर्चासत्रात इतर राज्यांतील प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी, महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपप्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर, पदव्युत्तर विभागप्रमुख डॉ. रेखा गुळवे, कमवि उपप्राचार्य सय्यद लाल, पर्यवेक्षक प्रा. जालिंदर कोळेकर, नाट्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजय पाटील देवळणकर यांनी मार्गदर्शन केले.