जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत सेमी इंग्रजी अभ्यासक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:23 IST2021-06-28T04:23:01+5:302021-06-28T04:23:01+5:30
संततधार पावसाने शेतकरी सुखावला शिरूर कासार : तालुक्यात शनिवारी दुपारी १२ वाजेपासून पावसाला सुरुवात झाली. रात्री १२ वाजेपर्यंत पावसाच्या ...

जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत सेमी इंग्रजी अभ्यासक्रम
संततधार पावसाने शेतकरी सुखावला
शिरूर कासार : तालुक्यात शनिवारी दुपारी १२ वाजेपासून पावसाला सुरुवात झाली. रात्री १२ वाजेपर्यंत पावसाच्या हलक्या सरी सुरूच होत्या. हा पाऊस खरिपाच्या पिकासाठी पोषक आहे. या पावसामुळे शेतकरी सुखावला असून, दुबार पेरणीचे संकट टळले आहे.
...
मराठा मोर्चास उपस्थित राहण्याचे आवाहन
शिरूर कासार : सोमवारी बीड येथे मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, यासाठी आयोजित मोर्चास तालुक्यातून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ॲड. चंपाकाकी पानसंबळ यांनी केले आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, यासाठी हा मोर्चा निघणार आहे. पक्ष, गटतटाचा विचार न करता सर्वांनी सहभागी होण्याचेही आवाहन केले आहे.
....
बसस्टॅडवर पाणी आणि चिखल
शिरूर कासार : तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बसस्थानकाच्या आवारात डांबरीकरण झाले नसल्याने पावसाचे पाणी, तसेच चिखल दिसून येत आहे. चिखल, पाण्यापासून सुटका होण्यासाठी या परिसराचे डांबरीकरण होण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
.....