बियाणांचा तुटवडा, शेतकरी हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:22 IST2021-07-04T04:22:35+5:302021-07-04T04:22:35+5:30
----------------------- - ऑनलाईन शिक्षणासाठी पालकांना प्रेरित करा अंबाजोगाई : कोरोनाच्या संकटात सर्वाधिक नुकसान शिक्षण क्षेत्राचे झाले आहे. जेव्हा शाळा ...

बियाणांचा तुटवडा, शेतकरी हैराण
----------------------- -
ऑनलाईन शिक्षणासाठी पालकांना प्रेरित करा
अंबाजोगाई : कोरोनाच्या संकटात सर्वाधिक नुकसान शिक्षण क्षेत्राचे झाले आहे. जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा होतील. मात्र सद्यस्थितीत सर्वप्रथम विद्यार्थ्यांना भयमुक्त करून गृहभेटीतून त्यांच्याशी आत्मियतेने संवाद साधत शाळा सुरू होण्यापूर्वी घरच्या घरी शिक्षणासाठी पालकांनाही जबाबदारी घेण्याकरिता शिक्षकांनी त्यांना प्रेरित केले पाहिजे, असे आवाहन भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे सहकार्यवाह प्रा.चंद्रकांत मुळे यांनी केले आहे.
----------------------------
फवारणी करताना खबरदारीचे आवाहन
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील शेतकरी सोयाबीन, तूर, कपाशी आदीचे उत्पन्न घेतात. सध्या बहुतांश शेतकरी लागवडीचे कामे करीत आहेत. तर काहींच्या शेतात पीक अंकुरले आहे. पीक अंकुरल्यानंतर कीटकनाशकांची फवारणी केली जाते. परंतु, फवारणी करताना दक्षता न घेतल्यास विषबाधा होण्याची शक्यता असते. तेव्हा फवारणी करताना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
---------------------
पुस्तके नाहीत तरी ऑनलाईन शिक्षणावर भर
अंबाजोगाई : यावर्षी सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे नवे शैक्षणिक सत्र जूनपासून सुरू झाले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे यंदाही ऑनलाईन पद्धतीनेच शाळा सुरू आहे. त्यातच पाठ्यपुस्तके उपलब्ध नसताना शैक्षणिक सत्रास सुरुवात करण्याची घाई झाली असल्याने विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांमध्ये ही संभ्रम निर्माण झाला आहे.
---------------------------
वाहनांवर कारवाई करा
अंबाजोगाई : परिवहन विभागाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. नियमानुसार इंग्रजीत नंबरप्लेट असणे आवश्यक असूनही मराठी नंबरप्लेट लावली जात आहे. असे करणाऱ्यांमध्ये राजकीय पक्षाशी संबंधित वाहनांची संख्या अधिक आहे. मात्र, त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही. वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देऊन तत्काळ कारवाईची मागणी करण्यात येत आहे