दुसऱ्या श्रावण सोमवारी वैद्यनाथ दर्शनास गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 23:56 IST2019-08-12T23:55:52+5:302019-08-12T23:56:37+5:30

‘हर हर महादेव, प्रभू वैद्यनाथ भगवान की जय’ चा जयघोष करीत हजारो भाविकांनी दुस-या श्रावण सोमवारी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले.

Second Shravan Monday, Vaidyanath Darshan crowd | दुसऱ्या श्रावण सोमवारी वैद्यनाथ दर्शनास गर्दी

दुसऱ्या श्रावण सोमवारी वैद्यनाथ दर्शनास गर्दी

परळी : ‘हर हर महादेव, प्रभू वैद्यनाथ भगवान की जय’ चा जयघोष करीत हजारो भाविकांनी दुस-या श्रावण सोमवारी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. पहिल्या श्रावण सोमवारपेक्षा यावेळी भाविकांची गर्दी दुप्पट होती. वैद्यनाथास आज शिवमूठ तीळ महिलांनी वाहिले तर पुरु ष भक्तांनी बिल्वपत्र वाहिले. रात्री १२ पासूनच श्रावण सोमवारच्या दर्शनासाठी भक्तांची रीघ सुरू झाली. वैद्यनाथ मंदिराच्या पायºयावर लोखंडी बॅरिकेट्समधून धर्मदर्शनची सुविधा होती. पासधारकांसाठीही स्वतंत्र रांग होती. मंदिर परिसरात बचतगटाचे स्टॉल लावले आहेत. पेढे, प्रसाद साहित्य घेण्यासाठी भाविकांची रेलचेल होती. पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाईच्या अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस निरीक्षक देविदास शेळके, बाळासाहेब पवार, अनुसया माने, सुरेखा धस यांच्यासह इतर पोलीस मंदिर परिसरात बंदोबस्तासाठी तैनात होते.

Web Title: Second Shravan Monday, Vaidyanath Darshan crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.