मूर्ती बनविणारे कारागीर आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:11 IST2021-09-02T05:11:58+5:302021-09-02T05:11:58+5:30

दोन वर्षांपासून गौरी गणपती आणि पोळा सणावर कोरोनाचे निर्बंध लादले होते. दोन वर्षांत सर्व सण-उत्सव साध्या पद्धतीने साजरे करावे ...

Sculptors in financial crisis | मूर्ती बनविणारे कारागीर आर्थिक संकटात

मूर्ती बनविणारे कारागीर आर्थिक संकटात

दोन वर्षांपासून गौरी गणपती आणि पोळा सणावर कोरोनाचे निर्बंध लादले होते. दोन वर्षांत सर्व सण-उत्सव साध्या पद्धतीने साजरे करावे लागल्याने मूर्ती विक्रीवर मोठा परिणाम झाला. गौरी गणपती मूर्ती तसेच मातीचे बैल बनविणाऱ्या कारागिरांवर मोठे संकट आले. यंदा येथील कुंभारवाड्यात दोन महिन्यांपासून मूर्ती बनविण्याचे काम करीत आहेत. यंदा तरी कोरोना संकट दूर होऊन सण-उत्सव साजरे व्हावेत, बनविलेल्या मूर्ती विक्री व्हाव्यात आणि कारागिरांवर गौरी गणपतीची कृपा व्हावी, अशी आशा कारागिरांना आहे.

यंदा तरी लक्ष्मी घरी यावी

लग्नानंतर गौरी-गणपतीच्या सणाला नववधू-वरांना माहेरच्या घरून लक्ष्मीची मूर्ती व अन्य साहित्य दिले जाते. मात्र, दोन वर्षांपासून कोरोना संकटात विवाहांचे प्रमाण घटले होते. लग्न झाले तरी कोरोनाच्या नियमांमुळे व भीतीमुळे लग्नानंतरचे अनेक कार्यक्रम अडचणीत होते. त्यामुळे अनेकांच्या घरी लक्ष्मी आली नाही. याचा मोठा फटका मूर्ती कारागिरांना बसला होता.

Web Title: Sculptors in financial crisis