दहा महिन्यानंतर पडदा उघडणार.....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:28 IST2021-01-09T04:28:17+5:302021-01-09T04:28:17+5:30
बीड : कोरोनामुळे दहा महिन्यांपासून बंद असलेली शहरातील चित्रपटगृहे सुरू होत असून येणाऱ्या प्रेक्षकांना मात्र मास्कचे बंधन राहणार आहे. ...

दहा महिन्यानंतर पडदा उघडणार.....
बीड : कोरोनामुळे दहा महिन्यांपासून बंद असलेली शहरातील चित्रपटगृहे सुरू होत असून येणाऱ्या प्रेक्षकांना मात्र मास्कचे बंधन राहणार आहे. सॅनिटायझर, एक आसन सोडून बैठक व्यवस्था केली असून दररोज आठ शोचे नियोजन राहणार आहे. कोरोनामुळे १ मार्चपासून चित्रपटगृहे बंद होती. दोन महिन्यांपूर्वी राज्य शासनाने अटी व शर्तीनुसार परवानगी दिली होती. मात्र कोरोनाचा आलेख लक्षात घेत चित्रपटगृह सुरू करण्याची चालकांची मानसिकता नव्हती. त्याचबरोबर नवीन चित्रपट प्रदर्शित झाले नाही. मागील अनेक दिवसांपासून चित्रपटगृह कधी सुरू होणार अशी विचारणा प्रेक्षक करीत होते. ही बाब लक्षात घेत आता दहा महिन्यानंतर पडदा उघडण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. तिकिट विक्री ऑनलाइन व चित्रपट गृहातील खिडकीतून होणार आहे. सध्या दर तितकेच असून कुठलेही बदल नसल्याचे संतोषीमाता चित्रपटगृहाचे व्यवस्थापक बासेत खान यांनी सांगितले.
(फोटो : बीडमध्ये ९ जानेवारीपासून चित्रपट गृह सुरू करण्याची तयारी शुक्रवारी सुरू होती. )