सावित्रीच्या लेकींनी जागविला थोर महिलांचा इतिहास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:27 IST2021-01-04T04:27:39+5:302021-01-04T04:27:39+5:30
अंबाजोगाई : सावित्रीच्या लेकींनी विविध वेशभूषा परिधान करून थोर माहिलांचा इतिहास जागविला. त्यांनी सावित्रीच्या कार्याचा गौरव करणारे ...

सावित्रीच्या लेकींनी जागविला थोर महिलांचा इतिहास
अंबाजोगाई : सावित्रीच्या लेकींनी विविध वेशभूषा परिधान करून थोर माहिलांचा इतिहास जागविला. त्यांनी सावित्रीच्या कार्याचा गौरव करणारे सामूहिक गीत गायिले. येथील श्री. योगेश्वरी नूतन विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती सामारंभात काही शिक्षिकांनी थोर महिलांच्या व्यक्तिरेखा उभारून श्रोत्यांची मने जिंकली. तिलोतम्मा इंगोले यांनी सावित्रीबाई फुले यांची व्यक्तिरेखा सादर केली. सत्यशीला मैंद यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, दैवशाला म्हेत्रे यांनी सिंधूताई सपकाळ, सुवर्णा देशमुख यांनी डॉ. आनंदी जोशी, आशा राखे यांनी मेधा पाटकर, शुभदा गोस्वामी यांनी अरुनिमा सिन्हा, वैशाली भुसा यांनी लक्ष्मीबाई टिळक यांची व्यक्तिरेखा साकारली.
यावेळी बचत गटातील महिला, पोषण आहार वाटप करणाऱ्या महिलांचा, सर्व शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला. शीतल गंगणे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. मुख्याध्यापिका अलका साळुंके यांनी अध्यक्षीय समारोप केला. पर्यवेक्षिका अपर्णा पाठक यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सूचिता कडके यांनी केले. डॉ. वंदना बालटकर आभार मानले. यावेळी शाळेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.