सावित्रीच्या लेकींचा सत्कार; नवीन वर्षाचे रक्तदानाने स्वागत; २३ वर्षांची अखंड परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:49 IST2021-01-08T05:49:33+5:302021-01-08T05:49:33+5:30

लोखंडी सावरगाव : अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील जनसेवा प्रतिष्ठान व सागर बेले सामाजिक प्रतिष्ठान यांच्यातर्फे नववर्षाचे ...

Savitri's Laki felicitated; Welcome the new year with blood donation; An unbroken tradition of 23 years | सावित्रीच्या लेकींचा सत्कार; नवीन वर्षाचे रक्तदानाने स्वागत; २३ वर्षांची अखंड परंपरा

सावित्रीच्या लेकींचा सत्कार; नवीन वर्षाचे रक्तदानाने स्वागत; २३ वर्षांची अखंड परंपरा

लोखंडी सावरगाव : अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील जनसेवा प्रतिष्ठान व सागर बेले सामाजिक प्रतिष्ठान यांच्यातर्फे नववर्षाचे स्वागत म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंधरा दात्यांनी रक्तदान केले तर सावित्रीच्या लेकींनी कोरोना महामारीच्या काळात उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल या ‘कोविड योद्ध्यां’चा प्रतिष्ठानच्यावतीने साडी-चोळी देऊन सत्कार करण्यात आला.

आशा कार्यकर्ता तारामती निशिगंध, शुभांगी यडायत, सुलोचना किर्दत तर अंगणवाडी कार्यकर्ता आशा बनसोडे, शकुंतला राऊत, सुलोचना बेले, अंगणवाडी मदतनीस मनिषा पांचाळ, विश्रांता कांबळे, अविद्या कर्डिले, पुष्पा शिनगारे यांचा साडी-चोळी देऊन सत्कार करण्यात आला. लोखंडी सावरगाव सजाचे तलाठी आर. जे. ननावरे, डॉ. देवगावकर व सलग २२ वर्षांपासून रक्तदान करणारे हनुमंत शेळके यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शंकरराव उबाळे, उद्घाटक नंदकिशोर मुंदडा, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नरेंद्र काळे, राजपाल देशमुख, दत्तात्रेय मुंडे, शेषराव नांदवटे, बसवेश्वर आप्पा नागरे, बाबासाहेब शेळके, राजाभाऊ राऊत, लक्ष्मण देशमाने यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी मुख्याध्यापक बी. के. कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन रामसिंग बेले यांनी केले तर ऋषिकेश बेले यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अक्षय बेले, गोपाळ बेले, डॉ. शीतल बेले, प्रतीक्षा थोरात, युवराज मुळे यांनी प्रयत्न केले.

Web Title: Savitri's Laki felicitated; Welcome the new year with blood donation; An unbroken tradition of 23 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.