शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

बीडचं पुणे होण्यापासून वाचवा; कोथरुडमधील बॅनरबाजीनंतर बीडकरांचे आंदोलनातून टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 17:19 IST

बीडची बदनामी थांबवा : कोथरुडमध्ये बॅनर लावणाऱ्यांवर बीडच्या आंदोलकांनी केली टीका

बीड : कोथरुडचे बीड होण्यापासून वाचवा, असे बॅनर पुण्याच्या कोथरुडमध्ये लागले होते. त्यानंतर बीडमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी याच्याविरोधात बीडची बदनामी थांबवा म्हणत पुणे जिल्ह्यातील घटनांचा इतिहास सांगत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. एवढेच नव्हे तर बीडचे पुणे होण्यापासून वाचवा, अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. यावर बॅनर लावणाऱ्यांवरही आंदोलकांनी गंभीर टीका केली.

बीड जिल्हा हा गुणवंतांचा आहे. या जिल्ह्याने कला, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, प्रशासकीय पातळीवर तसेच न्यायिक अशा विविध क्षेत्रात नाव उंचावलेले आहे. स्नेहभाव जपणारा, जातीय सलोखा जोपासणाऱ्या या बीड जिल्ह्याला काही लोक बदनाम करत आहेत. बीड जिल्ह्याची बदनामी थांबवा या प्रमुख मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आणि "कोथरुडचं बीड होऊ देणार नाही" पुण्यामध्ये बीडची बदनामी करणाऱ्या लागलेल्या फलकाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शेख युन्नूस, पांडुरंग हराळे, शेख मुबीन, शेख मुस्ताक, रामधन जमाले, सखाराम बेंगडे आदी सहभागी होते. जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड अजित पवार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

पुणेकरांनी नाकाने कांदे सोलणे बंद करावेपुण्यातील कोथरुडमध्ये बीड जिल्ह्याच्या विरोधात बॅनर लागावे ही घटना अत्यंत हास्यास्पद आहे. पुण्यात अनेक काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. हेच पुणेकर कोथरुडचे बीड होऊ देणार नाहीत असे म्हणत पुणेकरांनी आता नाकाने कांदे सोडणे बंद करावे, अशी टीका सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी केली.

या घटनांची पुणेकरांना दिली उदाहरणेपुण्यामधील कोयता गँग, अंमली पदार्थांची तस्करी, महिलांवर होणारे अत्याचार, लुटमार, मारामारी अशा अनेक घटना पुण्यात घडतात. जर इतिहास पाहिला तर जोशी अभ्यंकर हत्याकांड, रंगा बिल्ला यांना पोसणारा, महापुरुषांबद्दल गैरवर्तन, महात्मा गांधींना मारणारा नथुराम यांना पोसणारा अशी अनेक उदाहरणे या आंदोलनातून देण्यात आली आहेत. त्यामुळे बीडची बदनामी थांबवावी. पुणेकरांनी नाकाने कांदे सोलणे बंद करावे आणि आपल्याच जिल्ह्यातील गुन्हेगारी थांबविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही या आंदोलनातून करण्यात आली.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीPuneपुणे