सरपंच पुत्रावर धारदार शस्त्राने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:35 IST2021-01-23T04:35:01+5:302021-01-23T04:35:01+5:30
ग्रामपंचायत विरोधात विनाकारण तक्रार का करतो अशी विचारणा दादासाहेब साळवे यांनी अक्षय दानवे यास केली असता त्याने जातीवाचक ...

सरपंच पुत्रावर धारदार शस्त्राने हल्ला
ग्रामपंचायत विरोधात विनाकारण तक्रार का करतो अशी विचारणा दादासाहेब साळवे यांनी अक्षय दानवे यास केली असता त्याने जातीवाचक भाषेत शिवीगाळ करत साळवे यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. घटनेनंतर साळवे चकलांबा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जाताना हिवरवाडी शिवारात रस्त्यात अडवून दादासाहेब व सरपंच मंडाबाई साळवे यांना पुन्हा शिवीगाळ करुन तु गावात ये तुला जिवेच मारतो अशी धमकी अक्षय दानवे याने दिली.
दादासाहेब साळवे यांच्या फिर्यादीवरुन चकलांबा पोलिस ठाण्यात ॲट्रोसिटी कायदा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अक्षय दानवे यास पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. तपास उपविभागिय पोलिस अधिकारी स्वप्नील राठोड करीत आहेत तर जखमी दादासाहेब साळवे यांच्यावर बीड येथे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत