शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भररस्त्यात अपहरण करून सरपंचाची हत्या; संतप्त ग्रामस्थांनी मस्साजोग-केज महामार्ग पाडला बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 12:13 IST

रात्री नऊ वाजता कडक्याच्या थंडीत ग्रामस्थांनी मस्साजोग येथे केले ठिय्या आंदोलन

- मधुकर सिरसट केज ( बीड): तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे जुन्या वादातून अपहरण करून हत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर रात्री ९ वाजेच्या सुमारास कडक्याच्या थंडीत सरपंच देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना अटक करून तत्काळ फाशी द्या, मदत न करणाऱ्या दोषी पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करा, प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करा या मागण्यांसाठी ग्रामस्थांनी मस्साजोग बसस्थानकासमोरील महामार्गांवर ठिय्या आंदोलन केले. तर आज सकाळी ७ वाजेपासून मस्साजोग आणि साडेदहा वाजेपासून केज येथे रस्तारोको आंदोलन सुरू केले. दोन्ही ठिकाणी आंदोलन सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हे सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान केज येथून मस्साजोगकडे जीपमधून ( क्रमांक एम एच 44 / बी 3230 ) निघाले. उमरी शिवरातील टोल नाक्याजवळ पाच ते सहा जणांनी त्यांची जीप अडविली. गाडीच्या काचा फोडून सरपंच संतोष देशमुख यांना बाहेर काढत काठीने मारहाण करून अपहरण केले. मारकऱ्यांच्या दोन जीप देशमुख यांना घेऊन केजच्या दिशेने गेल्या. त्यानंतर जीपचालक शिवराज देशमुखने केज पोलीस ठाणे गाठून  सरपंच संतोष देशमुख यांचे अज्ञात ६ जणांनी मारहाण करत अपहरण केल्याची फिर्याद दिली. गुन्हा दाखल करून पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी तातडीने दोन पथकांची स्थापना करून तपासाचे आदेश दिले. दरम्यान, सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास बोरगाव दैठना या रस्त्यावर सरपंच संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 

ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन; मस्साजोग,केज मध्ये वाहतूक ठप्पदरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांच्या अटकेसाठी ग्रामस्थांनी रात्री ९ वाजेच्या सुमारास कडक्याच्या थंडीत मस्साजोग बसस्थानकासमोर ठिय्या देत रस्तारोको केला. सर्व आरोपींना अटक करा, दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी मस्साजोगमधील वृद्ध, महिला, ग्रामस्थांनी केली. रस्तारोकोमुळे दोन्ही बाजूने तब्बल ५ किमी अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. काही वाहनधारक आरणगांव, जाधवजवळा मार्गे तर काही पिंपळगाव, विडा, येवता मार्गे पुढे गेले. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, पहाटे दीड वाजता पोलिसांनी तीन आरोपी पकडल्याची माहिती दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, आज सकाळी सात वाजेपासून पुन्हा एकदा ग्रामस्थांनी सर्व आरोपींच्या अटकेची मागणी करत मस्साजोग येथे तर सकाळी साडेदहा पासून केज येथे रस्तारोको आंदोलन सुरू केले आहे. यामुळे पुन्हा एकदा मस्साजोग ते केज महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी होऊन मोठ्याप्रमाणावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

तीन आरोपी पकडल्याची माहितीसोमवारी सायंकाळी गुन्हा नोंद होताच पोलिसांनी दोन पथकाच्या माध्यमातून तपास सुरू केला. आरोपी जीपमधून वाशीकडे जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी नांदुर ते वाशी रस्त्यावर पाठलाग केला. तसेच वाशी पोलिसांना माहिती देऊन पुढे रस्ता अडविण्यात आला. यामुळे जीप मध्येच उभी करून आरोपी पसार झाले. मागावर असलेल्या पोलिसांनी पाठलाग करून तीन आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. 

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणagitationआंदोलन