शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच संतोष देशमुख खून प्रकरण; काँग्रेस काढणार मस्साजोग ते बीड सद्भावना यात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 15:36 IST

सरपंच संतोष देशमुख कुटुंबियांची काँग्रेससह इतर नेत्यांनी घेतली भेट

केज : तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची रविवारी माजी मंत्री तथा चर्मकार महासंघाचे अध्यक्ष बबनराव घोलप, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील आणि भीम आर्मीचे दीपक केदार यांनी भेट घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी मस्साजोग ते बीड अशी सद्भावना यात्रा काढणार असल्याचे काँग्रेसकडून जाहीर करण्यात आले.

मस्साजोग येथे रविवारी सकाळी ११ वाजता भीम आर्मीचे दीपक केदार यांनी भेट देत भीमसैनिक म्हणून आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे सांगितले. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचे रील्स फेसबुक व इन्स्टाग्रामवर टाकले जातात. तरीसुद्धा येथील सायबर यंत्रणा यावर अंकुश ठेवण्यात अपयशी ठरली आहे. पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन अशा सर्व अकाऊंटची सविस्तर माहिती आपण त्यांना सादर करून दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे केदार यांनी सांगितले.

काँग्रेसच्या शिष्टमंडळाची भेटभारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली लवकरच मस्सजोग ते बीड सद्भावना यात्रा काढण्यात येणार आहे. त्याचा समारोप बीड येथे होणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी मस्साजोग येथे दिली. यावेळी काँग्रेसच्या शिष्टमंडळात पाटील यांच्यासह बीडचे जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, प्रदेश सरचिटणीस अमर खानापुरे, सत्संग मुंडे आदी होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी बोलणारउद्धवसेनेचे माजी मंत्री तथा राष्ट्रीय चर्मकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप यांनीही रविवारी धनंजय देशमुख यांची भेट घेऊन तुम्हाला न्याय मिळेपर्यंत मी तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मस्साजोगला येण्याची मानसिकता आहे. आपण उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन या प्रकरणाची त्यांना सविस्तर माहिती देणार असल्याचे सांगून एवढ्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी पोलिसांना सापडत नाहीत, हे पोलिस यंत्रणेचे अपयश आहे, असा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणBeedबीडcongressकाँग्रेसCrime Newsगुन्हेगारी