तालुक्यात २७ महिला भूषवणार सरपंचपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:02 IST2021-02-06T05:02:47+5:302021-02-06T05:02:47+5:30
सदरील सोडतीत नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला) ७ ग्रामपंचायत आरक्षित झाल्या. यामध्ये कोळवाडी, पांगरी, बावी, माळेगाव (च), सावरगाव, टाकळवाडी, ...

तालुक्यात २७ महिला भूषवणार सरपंचपद
सदरील सोडतीत नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला) ७ ग्रामपंचायत आरक्षित झाल्या. यामध्ये कोळवाडी, पांगरी, बावी, माळेगाव (च), सावरगाव, टाकळवाडी, व आर्वी या ग्रामपंचायतीचा समावेश आहे, तर मातोरी, कमळेश्वर धानोरा, टेंभुर्णी या तीन ग्रामपंचायतमध्ये अनुसूचित जातीच्या महिला सरपंच पदाच्या दावेदार आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी कान्होबाची वाडी, तागडगाव, रायमोह, पाडळी, हाटकर वाडी, गोमाळवाडा व भानकवाडी यांचा समावेश आहे. सर्वसाधारण प्रवर्गामध्ये १७ महिला सरपंच आरक्षित केल्या गेल्या. त्यात निमगाव (मा), हाजीपूर, आनंदगाव, वारणी, घाटशील पारगाव, पौंडुळ, फुलसांगावी, मलकाची वाडी, ब्र, येळंब, नांदेवली, जांब, खोपटी , भडकेल, येवलवाडी, जाटनांदूर, घोगस पारगाव व लोणी या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
खोकरमोह, उकिरडा( च), राक्षस भुवन , वडळी, पिंपळनेर, मानूर, शिरापूर धुमाळ, राळेसांगावी, तिंतरवणी, लिंबा- खांबा, बोरगाव (च), दहीवंडी, शिरापूर गात, सांगळवाडी, खालापुरी, झापेवाडी या सोळा ग्रामपंचायत सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या आहेत.
हिवरसिंगा आणि तरडगव्हाण या दोन ग्रामपंचायती अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाल्या आहेत.
आरक्षण सोडतीत प्रभारी तहसीलदार शिवाजी पालेवाड, नायब तहसीलदार बाळासाहेब खेडकर, नायब तहसीलदार किशोर सानप, गटविकास अधिकारी बळीराम चव्हाण व निवडणूक विभागाचे बाबा जायभाये यांनी सोडतीचे कामकाज पाहिले. सिद्धेश्वर गायकवाड या लहान मुलांच्या हाताने चिठ्ठी काढून आरक्षण जाहीर झाले.