in Saratewadgaon; Excitement over the death of 2 crows n 16 hens | सराटेवडगावमध्ये १६ कोंबड्या; २ कावळ्यांच्या मृत्यूने खळबळ

सराटेवडगावमध्ये १६ कोंबड्या; २ कावळ्यांच्या मृत्यूने खळबळ

ठळक मुद्देमागील पाच दिवसात १०० कोंबड्यांचा मृत्यू

- अविनाश कदम 
आष्टी : जगभरासह देशामध्ये सध्या कोरोना महामारिचे संकट सुरु असताना, आता बर्ड फ्लूने देखील डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे.आष्टी तालूक्याच्या सरहद्दीवर असलेल्या जामखेड तालुक्यातही बर्ड फ्लू ने शिरकाव केला आहे.मृत्यु झालेल्या कावळ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.आष्टी तालुक्यातील शिरापूर येथेही शेकडो कोबड्या मरण पावल्या आहेत.मागिल ४ ते ५ दिवसांपासून सराटेवडगांव येथील शेतकरी व पोल्ट्री मधील १०० कोंबड्या व २ कावळे मरण पावल्याने घटनास्थळी पशुवैद्यकीय पथक दाखल झाले आहे. यावेळी १६ कोंबड्या मृत आढळून आल्या असून सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

आष्टी तालुक्यातील सराटेवडगांव येथे दि.१६ रोजी एक तर दि.१७ रोजी एक असे एकूण २ कावळे मृत झाल्याची घटना घडली आहे. तसेच रावसाहेब मल्हारी गजघाट यांच्या पोल्ट्री मधील १६ कोंबड्या, बापूराव गायकवाड यांच्या पोल्ट्रीतील  १० ते  १२ कोंबड्या अचानक मरण पावल्या असल्याने नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. या मृत कोंबड्यांचे सॅम्पल तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असून घटनास्थळी पशुवैद्यकीय पथकाचे डॉ.एस.के.गदादे, डाॅ.एस.डी.शिंदे, सहाय्यक परिचर वांढेकर, सहाय्यक परिचर चौधरी यांची टिम व सरपंच राम बोडखे दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे.

आतापर्यंत १०० कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे
गावामध्ये मागिल आठ दिवसांपासून कोंबड्यांचा मृत्यू होत आहे.दि.१६ व १७ रोजी प्रत्येक एक एक म्हणजे २ कावळ्यांचा मृत्यू झाला आहे.गावातील शेतकरी व पोल्ट्री फार्म मधील जवळपास १०० पेक्षा जास्त पक्षी मृत झाले आहेत.
- राम बोडखे ( सरपंच सराटेवडगांव - आनंदवाडी ) 

अहवाल आल्यानंतर कारण कळेल
सराटेवडगांव येथील शेतकरी रावसाहेब गजघाट यांच्या पोल्ट्री मधील १६ कोंबड्या मृत आढळून आल्या असून या कोंबड्यांचे सॅम्पल प्रादेशिक रोग प्रयोगशाळा पुणे येथे पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल  - डॉ.एस.के.शिंदे ( पशुवैद्यकीय अधिकारी )

Web Title: in Saratewadgaon; Excitement over the death of 2 crows n 16 hens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.