शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

संतोष देशमुखांच्या भावाला वाल्मीक कराड समर्थकाची पोलिस ठाण्यात अरेरावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 11:24 IST

वाल्मीक कराड कोठडीत असलेल्या ठाण्यातील प्रकार

बीड : खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मीक कराड कोठडीत असलेल्या बीड शहर ठाण्यात दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना एका माजी सरपंचाने अरेरावी केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने अरेरावी करणाऱ्याला पाठीशी घातल्याचा आरोप धनंजय यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी पोलिस अधीक्षकांकडे लेखी तक्रार केली आहे.

९ डिसेंबर २०२४ रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या झाली. यातील सातपैकी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तीन आरोपी अजूनही मोकाटच आहेत. जेव्हापासून सीआयडीकडे तपास आला, तेव्हापासून एकही आरोपी अटक नाही. त्यामुळे धनंजय देशमुख व त्यांचे साडू दादासाहेब खिंडकर हे बुधवारी सायंकाळच्या सुमारास बीड शहर ठाण्यात आले होते. यावेळी तेथे कारेगावचे माजी सरपंच बालाजी तांदळेदेखील वाल्मीक कराडला भेटण्यासाठी आले होते. तांदळे यांनी धनंजय यांना ‘तू इथे काय करायला, सीआयडीवाले कुठे आहेत’, असे म्हणत वाल्मीक कराड याला ठेवलेल्या कोठडीकडे गेले. तिथून परत आल्यानंतर ‘तुम्ही ६ डिसेंबरच्या दिवशी पवनचक्कीजवळ झालेल्या वादाच्या ठिकाणी होतात’, असे धनंजय म्हणाले. यावर ‘आरोपी मीच पकडले’ असे सांगत हत्या करणाऱ्या सुदर्शन घुले याचा फाेटो धनंजय यांना दाखवत तांदळे यांनी अरेरावी केली.

हा प्रकार देशमुख यांनी ठाणे अंमलदार मीरा रेडेकर यांना सांगितल्यावर तांदळे यांनी त्यांच्याशी हुज्जत घातली. ‘मी सीआयडीचा वाहनचालक आहे’, असे त्याने दंगल नियंत्रण पथकातील कर्मचाऱ्यांनाही सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करून संंबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

घुलेचा फाेटो दखवून दहशतज्या ठिकाणी आरोपी आहेत अशा ठिकाणी असे लोक येतात कसे? खून करणारे मुख्य आरोपी अद्याप सापडले नाहीत आणि मला त्या आरोपी सुदर्शन घुले याचा फोटो दाखवून तांदळे हा मला दहशतीखाली घेत होता, अशी तक्रार धनंजय यांनी केली. त्यामुळे तांदळे यांची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी. तसेच एपीआय दराडे यांनी तांदळे यांना पाठीशी का घातले, दराडे आणि तांदळे यांचे संगनमत आहे. त्यामुळे दराडे यांचीही चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणीही तक्रारीतून केली आहे.

कारवाई होईलधनंजय देशमुख यांची तक्रार आली आहे. याची चौकशी केली जात आहे. सीआयडीने कोणाला चौकशीला बोलावले होते की खोटे बोलून आत प्रवेश केला, याची चौकशी केली जाईल. जर कोणी दोषी असेल तर कारवाई होईल.- सचिन पांडकर, अपर पोलिस अधीक्षक, बीड.

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणBeedबीडCrime Newsगुन्हेगारीwalmik karadवाल्मीक कराड