शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधातून हत्येचा बनाव, एक महिला तयार केली; संतोष देशमुख प्रकरणात मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 17:11 IST

Santosh Deshmukh : संतोष देशमुखांची हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे दाखवण्याचा कट होता, असा आरोप धनंजय देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केला आहे.

Santosh Deshmukh Murder Case : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख, यांच्या हत्येला दोन महिने उलटून गेले, पण अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. अशातच, राष्ट्रवादी काँग्रेस(शप)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज देशमुख कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमोर मस्साजोगच्या ग्रामस्थांनी खळबळजनक दावा केला आहे. महिलेसोबत अवैध संबंधातून संतोष देशमुखांची हत्या झाल्याचा बनाव पोलिसांनी रचला होता. यासाठी एक महिलाही तयार ठेवली होती. पण, गावातील तरुणांनी अँब्युलन्सचा पाठलाग केला आणि डाव उलथून लावला, असा खळबळजनक दावा ग्रामस्थांनी केला आहे. 

मयत संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख, यांनीदेखील या आरोपाला दुजोरा दिला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा कट खुद्द बीड पोलिसांनीच रचला होता, संतोष देशमुखांची हत्या ही अनैतिक संबंधातून झाल्याचे दाखवण्याचा प्रयत्न होता. त्यासाठी कळंबमध्ये एक बाईही तयार ठेवण्यात आली, पण गावकऱ्यांच्या जागरुकतेमुळे पोलिसांचा हा कट उधळून लावण्यात आला, असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला. 

असा आहे त्या दिवशीचा घटनाक्रम...धनंजय देशमुखांनी त्या दिवशीचा सगळा घटनाक्रम सांगितला. ते म्हणाले की, संतोष आण्णांना दवाखान्यात न्यायचे आहे, असे एका सहकाऱ्याने फोनवर सांगितले. पण पोलिसांनी त्यावेळी काय घडले, याची माहिती कुणालाही लागू दिली नाही. संतोष देशमुखांना घेऊन जाणारी अँब्युलन्स अचानक कळंबच्या दिशने निघाली. केजमध्ये रुग्णालय आणि पोलिस स्टेशन असूनही कळंबच्या दिशेने अँब्युलन्स का नेली जात आहे, असा प्रश्न त्यावेळी तरुणांना पडला. संशय आल्यामुळे तरुणांनी त्या अँब्युलन्सचा पाठलाग केला आणि पोलिसांचा हा कट अयशस्वी ठरला.

कळंबमध्ये बाई तयार होतीसुरेश धसांनी हा मुद्दा सभागृहात मांडला होता. त्यावेळीही त्यांनी कळंबमध्ये एक महिलेला तयार ठेवण्यात आल्याचे आमि आणि हत्येला वेगळे वळण देण्याचा कट असल्याचा आरोप केला होता. माणसांना मारायचे, हातपाय मोडायचे, रक्तबंबाळ करायचे हे आरोपींचे काम. त्यांनी कळंबमध्ये एका महिलेले पैसे देऊन तयार ठेवले असायचे. मग छेडछाडीतून त्या व्यक्तीला मारण्यात आल्याचे चित्र निर्माण करायचे आणि त्यानंतर ती महिला विनयभंगाची केस करायची. असे प्रकार मोठ्या प्रमाणात व्हायचे. या प्रकरणात कुठे केस दाखल करुन घेतली जायची नाही. उलट समाजातून त्या व्यक्तीला उठण्याची वेळ यायची. समाजासाठी लढणाऱ्या होतकरू तरुणाला बदनाम करण्याचा पोलिसांचा आणि आरोपींचा कट होता, असा आरोपही धनंजय देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केला. 

टॅग्स :Santosh Deshmukhसंतोष देशमुखwalmik karadवाल्मीक कराडBeedबीडDhananjay Mundeधनंजय मुंडे