भारतभ्रमण करणारे सायकलपटू संतोष बालगीर यांचा केजमध्ये सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:22 AM2021-06-21T04:22:10+5:302021-06-21T04:22:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क केज : जागतिक वारसा स्थळांचे जतन व भारतीय सैनिकांना सलाम या उद्देशाने संजीवनी सफर मोहिमेंतर्गत सायकलवर ...

Santosh Balgir, a cyclist touring India, felicitated in a cage | भारतभ्रमण करणारे सायकलपटू संतोष बालगीर यांचा केजमध्ये सत्कार

भारतभ्रमण करणारे सायकलपटू संतोष बालगीर यांचा केजमध्ये सत्कार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

केज : जागतिक वारसा स्थळांचे जतन व भारतीय सैनिकांना सलाम या उद्देशाने संजीवनी सफर मोहिमेंतर्गत सायकलवर बारा हजार किलोमीटर अंतराचा प्रवास करत भारतभ्रमण करणारे सायकलपटू संतोष बालगीर यांचे केजमध्ये स्वागत करून सत्कार करण्यात आला. यावेळी सायकलपटू संतोष बालगीर यांनी भारतभ्रमण करताना आलेले अनुभव व्यक्त केले.

लातूर जिल्ह्यातील वासनगाव येथील रहिवासी संतोष बालगीर या तरुणाने संजीवनी सफर या मोहिमेच्या माध्यमातून २० डिसेंबर २०२० रोजी भारतभ्रमण सुरू केले. सायकलवरून १२ हजार किलोमीटर अंतराचा सायकल प्रवास पूर्ण केला. दक्षिण भारत, उत्तर भारत, कारगिल असा संपूर्ण प्रवास केला. परतीच्या प्रवासात १८ जून रोजी सायंकाळी केज येथे स्वागत करण्यात आले. शहरातील नागरिकांच्या वतीने संतोष बालगीर यांचा सत्कार ज्येष्ठ नागरिक भाऊसाहेब देशपांडे व माजी नगराध्यक्ष पशुपतीनाथ दांगट यांच्या हस्ते संतोष बालगीर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार सचिन देशपांडे, सहायक पोलीस निरीक्षक राजेश खांडवे, वैद्यनाथ बँकेचे संचालक प्रवीण देशपांडे, दादा जमाले, प्राचार्य हनुमंत सौदागर आदी उपस्थित होते. यावेळी संतोष बालगीर याने भारत भ्रमण करताना १८० दिवसांत १२ हजार किलोमीटरच्या प्रवासात आलेले अनुभव व्यक्त केले. या कार्यक्रमास समीर देशपांडे, निखिल बिक्कड, व्यंकटेश कुलकर्णी, दत्तात्रय गाढवे, यशवंत कुळकर्णी व शहरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. सत्कार समारंभाचे आयोजन वरद देशपांडे यांनी केले.

===Photopath===

200621\20bed_3_20062021_14.jpg~200621\20bed_2_20062021_14.jpg

Web Title: Santosh Balgir, a cyclist touring India, felicitated in a cage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.