वसंतदादा पाटील महाविद्यालयामध्ये संत सेवालाल यांची जयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:34 IST2021-02-16T04:34:08+5:302021-02-16T04:34:08+5:30

पाटोदा : येथील नवगण शिक्षण संस्था संचलित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सोमवारी (दि. १५) संत ...

Sant Sewalal's birthday celebrations at Vasantdada Patil College | वसंतदादा पाटील महाविद्यालयामध्ये संत सेवालाल यांची जयंती उत्साहात

वसंतदादा पाटील महाविद्यालयामध्ये संत सेवालाल यांची जयंती उत्साहात

पाटोदा : येथील नवगण शिक्षण संस्था संचलित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सोमवारी (दि. १५) संत सेवालाल यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बळीराम राख होते. त्यांच्या हस्ते संत सेवालाल यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पमाल्यार्पण करण्यात आले. व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा. डॉ. किशोर मचाले, पदव्युत्तर विभाग संचालक प्रा. डॉ. मनोजकुमार प्रकाश, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. नंदकुमार पटाईत, पर्यवेक्षक प्रा. रमेश टाकणखार, रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. गणेश पाचकोरे, कार्यालय अधीक्षक अशोक पवार, मुख्य लिपिक अनिल क्षीरसागर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. कुशाबा साळुंके यांनी केले. अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ. बळीराम राख यांनी केला. आभारप्रदर्शन प्रा. डॉ. गणेश पाचकोरे यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Sant Sewalal's birthday celebrations at Vasantdada Patil College