शालेय पोषण आहार कामगाराची संक्रांत गोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:49 IST2021-01-08T05:49:11+5:302021-01-08T05:49:11+5:30

धारूर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित व विना अनुदानित शाळा, वसतिशाळांमध्ये मध्यान्ह भोजन देणाऱ्या ...

Sankrant sweets for school nutrition workers | शालेय पोषण आहार कामगाराची संक्रांत गोड

शालेय पोषण आहार कामगाराची संक्रांत गोड

धारूर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित व विना अनुदानित शाळा, वसतिशाळांमध्ये मध्यान्ह भोजन देणाऱ्या पोषण आहार कामगारांची संक्रांत गोड होणार आहे. या कामगारांचे नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांचे मानधन जमा झाल्याची माहिती संघटनेचे बीड जिल्हा सचिव डॉ. अशोक थोरात यांनी माहिती दिली.

जिल्हा परिषदेच्या प्राथिमक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील ५,३९० कामगारांच्या खात्यावर प्रत्येकी १,५०० रुपयेप्रमाणे दोन महिन्यांच्या मानधनापोटी १ कोटी ६१ लाख ७० हजार रुपये जमा झाले आहेत.

त्यामुळे शालेय पोषण आहार महिला कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे जिल्हा अध्यक्ष कॉ. प्रभाकर नागरगोजे, मोहन ओव्हाळ, अशोक पोपळे, कॉ. मीरा शिंदे, अशोक कातखडे, भाग्यश्री साळुंके, मधुकर गुंजाळ, अरुण कातखडे, रमेश पंचाळ, भागवत जाधव, दीपाली खाडे, रेखा डोंगरे, वैशाली आर सूळ, रेखा ढोले, शंकर राहाटे निर्मला गाडेकर, शेख सायराबी, छाया धोडे आदींनी सांगितले.

Web Title: Sankrant sweets for school nutrition workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.