टाकसाळ बुरूजाच्या परिसरात स्वच्छता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:48 IST2021-01-08T05:48:40+5:302021-01-08T05:48:40+5:30
: शहरातील दुर्गप्रेमी व कायाकल्प फाउंडेशनच्या वतीने ऐतिहासिक किल्ल्यात स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत टाकसाळ बुरूजाच्या परिसरात ...

टाकसाळ बुरूजाच्या परिसरात स्वच्छता अभियान
: शहरातील दुर्गप्रेमी व कायाकल्प फाउंडेशनच्या वतीने ऐतिहासिक किल्ल्यात स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत टाकसाळ बुरूजाच्या परिसरात स्वच्छता अभियान राबवून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.
दर रविवारी दोन तास कायाकल्प फाउंडेशन तथा गड दुर्ग प्रेमी किल्ला परिसरात स्वच्छता अभियान राबवितात. पर्यटक व बहुसंख्य नागरिक ऐतिहासिक महादुर्ग किल्ला पाहण्यासाठी येत आहेत. ऐतिहासिक ठेवा असलेल्या खुणा, तटबंदी, भुयार व झाडांनी व वेलींनी झाकलेला आहे. हा ठेवा पर्यटकांच्या निदर्शनास यावा व या किल्ल्याचा नावलौकिक वाढावा या उद्देशाने स्वच्छता अभियान सुरू आहे. तसेच थोर पुरुषांची विचार प्रेरणा मिळत राहावी यासाठी त्यांची जयंती ऐतिहासिक किल्ल्यात साजरी केली जाते. रविवारी सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. स्वच्छता अभियानासाठी शाकेर सय्यद, कायाकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष दिनेश कापसे, अलंकार कामाजी, बालाजी सातभाई, महेश गवळी व जलदूत विजय शिनगारे आदींनी सहभाग नोंदवला.