वाळू तस्करांना दणका, हायवासह ट्रक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:37 IST2021-09-27T04:37:17+5:302021-09-27T04:37:17+5:30

गेवराई : तालुक्यातील बोरगाव आणि सुरळेगाव परिसरातील गोदावरी नदी पात्रात पोलिसांनी छापा मारून जेसीबी, हायवा, ट्रक ...

Sand smugglers hit, trucks confiscated along the highway | वाळू तस्करांना दणका, हायवासह ट्रक जप्त

वाळू तस्करांना दणका, हायवासह ट्रक जप्त

गेवराई : तालुक्यातील बोरगाव आणि सुरळेगाव परिसरातील गोदावरी नदी पात्रात पोलिसांनी छापा मारून जेसीबी, हायवा, ट्रक असा मुद्देमाल जप्त करीत वाळू तस्करांना दणका दिला. शुक्रवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. गोदावरी नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर चकलांबा पोलीस ठाण्याचे सपोनि भास्कर नवले यांनी पो.ना. येळे, पोलीस शिपाई रुईकर व इतर कर्मचाऱ्यांना सोबत घेत बोरगाव परिसरात वाळू उपसा करत असलेले जेसीबी व एक हायवा ताब्यात घेतला, तसेच दुसऱ्या एका कारवाईत सुरळेगाव येथे एक वाळूने भरलेला ट्रक ताब्यात घेऊन तब्बल २४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईने वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

गेवराई तालुक्यातून गेलेल्या गोदावरी नदीतून अवैधरीत्या वाळू उपसा सुरूच आहे. कारवाई करण्यात आलेली वाहने पोलीस ठाणे चकलांबा येथे लावण्यात आली आहेत. याप्रकरणी वाहनाच्या चालक व मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आल्याचे सपोनि भास्कर नवले यांनी सांगितले.

260921\img-20210926-wa0230_14.jpg~260921\img-20210926-wa0231_14.jpg

Web Title: Sand smugglers hit, trucks confiscated along the highway