वाळूचे भाव घसणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:28 IST2021-02-05T08:28:27+5:302021-02-05T08:28:27+5:30
बीड : जिल्ह्यातील वाळू घाटांचेे लिलाव झालेले नसल्यामुळे बांधकाम करणाऱ्या नागरिकांना चढ्या दराने वाळू विकत घ्यावी लागत ...

वाळूचे भाव घसणार
बीड : जिल्ह्यातील वाळू घाटांचेे लिलाव झालेले नसल्यामुळे बांधकाम करणाऱ्या नागरिकांना चढ्या दराने वाळू विकत घ्यावी लागत होती. तसेच लिलाव झालेले नसल्यामुळे मोठ्याप्रमाणात चोरट्यापद्धतीने अवैधरित्या वाळू उपसा व वाहतूक केली जात होती. मात्र, जिल्ह्यातील २१ वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया लवकरच होणार यामुळे वाळूचे भाव घसरण्याची शक्यता असून, यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
सन २०२० - २०२१ साठी बीड जिल्ह्यातील एकूण २१ वाळू घाट लिलावा करण्यात येणार आहेत. राज्यस्तरीय पर्यावरण आघात मूल्यांकन प्राधिकरण समिती महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी बीड जिल्ह्यातील २१ वाळू घाटांचे ई-टेंडर व ई-ऑक्शन या पद्धतीने लिलाव करण्यात येणार आहेत वाळू घाटामध्ये गेवराई तालुक्यातील एकूण १७ माजलगाव तालुक्यातील ३ आणि परळी तालुक्यातील १ अशा २१ वाळू घाटांचा समावेश आहे. या लिलावाची प्रक्रिया १२ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. प्रशासनाने यासंदर्भात संबंधित वेबसाईटवर जाऊन लिलावात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान या वाळू घाटाच्या लिलावामुळे अवैधरित्या होणाऱ्या वाळू वाहतुकीस चाप बसणार आहे.
एका टिप्परसाठी मोजावे लागत होते ५५ ते ६० हजार
वाळूचे लिलाव झालेले नसल्यामुळे अवैधरित्या वाळू खरेदी करण्यासाठी टिप्परमागे ५५ ते ६० हजार रुपये मोजावे लागत होते. यामुळे बांधकाम खर्चात वाढ झाली होती. दरम्यान या चोरट्या वाळू उपसा व वाहतुकीमुळे महसूल व पोलीस प्रशासनातील हाप्तेखोरी देखील वाढली होती. याला देखील आळा बसणार असण्याचे मत नागरिकांमधून व्यक्त केले जात आहे. तर, वाळू वाहतूक करणाऱ्यांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.