शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

वाळू माफियांचा कहर ! तहसिलदारांनी पकडलेला हायवा रस्त्यातूनच पळवण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 19:14 IST

हायवा ट्रक रस्त्यात अडवून पळवण्याचा झाला प्रयत्न

माजलगाव (बीड ) : तहसिलदार डॉ. प्रतिभा गोरे यांनी सावरगाव शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारा एक हायवा ट्रक पकडला. यानंतर तहसील कार्यालयात परतत असताना जप्त हायवा ट्रकला वाळू माफियांनी अडवून पळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी सात जणांवर चोरी व शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तालुक्यातील हिवरा (बु) या ठिकाणी 10-12 दिवसापासुन वाळूचा ठेका सुरु आहे. या ठेक्यावरुन सर्व नियमांची पायमल्ली करुन वाळू उपसा सुरु आहे. या ठिकाणावरुन हायवा मध्ये तीन ब्रास वाळू ला परवानगी असतांना पाच ते सहा ब्रास वाळू घेवून जात असल्याची माहिती तहसिलदार डॉ.प्रतिभा गोरे यांना मिळाली. डॉ. गोरे या मंगळवारी (दि.२३ ) सायंकाळी 5 वाजता बीडवरुन शासकीय कामकाज आटोपून येत असतांना सावरगाव शिवारात त्यांनी वाळूची वाहतूक करणारा एक हायवा ( क्र.एम.एच.23 डब्बलु 2302 ) अडवला. तपासणी केली असता त्यात पाच ब्रास वाळू आढळून आली. 

शासकीय चालक संजय भागवत यास हायवा तहसील कार्यालयात आणण्यास सांगितले. रस्त्यामध्ये हायवास जीवन जगताप, नागेश पडघम व इतर चारपाच जणांनी अडवला व चालक भागवत यांना खाली खेचले. त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देत हायवा पळवून नेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे यांच्या फिर्यादीवरुन राञी 11-30 वाजता वरील आरोपी विरुद्ध चोरी व शासकीय कामात अडथळा,जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी व महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966,21(1),महाराष्ट्र गौण खनिज अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ नरके हे करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTahasildarतहसीलदारBeedबीडsandवाळू