नेकनूर परिसरातील नद्यातून वाळू उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:26 IST2021-02-05T08:26:33+5:302021-02-05T08:26:33+5:30
अंबाजोगाई : शासनाने इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा अंबाजोगाई तालुक्यात सुरू केल्या आहेत. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन होत असले ...

नेकनूर परिसरातील नद्यातून वाळू उपसा
अंबाजोगाई : शासनाने इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा अंबाजोगाई तालुक्यात सुरू केल्या आहेत. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन होत असले तरी शाळेमध्ये विद्यार्थी जाण्यास अजूनही धजावत नाहीत. कोरोनाच्या भीतीमुळे पालकही विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याबाबत साशंक आहेत. शाळेत शिक्षक आहेत; मात्र विद्यार्थ्यांची अत्यल्प संख्या आहे.
काटेरी झुडपांचा वाहनधारकांना त्रास
राक्षसभुवन : गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन ते उमापूर या १० कि.मी. रस्त्यालगत बाभळीची काटेरी झाडे वाढली आहेत. रस्ता लहान, झाडे मोठी अशी परिस्थिती झाल्यामुळे अनेकांना याचा त्रास होत आहे. झुडपे काढण्याची मागणी ग्रामस्थांसह वाहनचालकांनी केली.
लघू व्यावसायिकांच्या जागेचा प्रश्न गंभीर
केज : शहरात रस्त्याच्या दुतर्फा बसून लहान-मोठा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. जागा उपलब्ध नसल्याने रस्त्याच्या कडेला ज्यांच्या मालकीच्या जागा आहेत, त्यांच्या मर्जीनुसार भाडे देऊन जागा किरायाने घ्यावी लागत आहे. शहराच्या भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग कामासाठी रस्त्याचे खोदकाम केल्याने अनेकांवर त्यांचे व्यवसाय जागेअभावी बंद करण्याची वेळ आली आहे.