संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता सवांद मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:07 IST2021-07-13T04:07:55+5:302021-07-13T04:07:55+5:30
धारूर : संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्याचा संवाद मेळावा तेलगाव येथे उत्साहात पार पडला. यावेळी वडवणी माजलगाव तालुका पदाधिकाऱ्यांची ...

संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता सवांद मेळावा
धारूर : संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्याचा संवाद मेळावा तेलगाव येथे उत्साहात पार पडला. यावेळी वडवणी माजलगाव तालुका पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
मेळाव्याचे उद्घाटन केंद्रीय निरीक्षक शशिकांत कन्हेरे, तर अध्यक्षस्थानी राहुल वाईकर हे उपस्थित होते. वडवणी तालुकाध्यक्षपदी रमेश रोमन यांची निवड करण्यात आली, तर तालुका उपाध्यक्षपदी पंढरीनाथ वांडरे, माजलगाव तालुका उपाध्यक्षपदी अण्णासाहेब सोळंके यांची निवड करण्यात आली.
संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विजय दराडे यांनी मार्गदर्शन केले. धारूर तालुकाध्यक्ष रमेश मोरे यांनी या बैठकीचे आयोजन केले होते, यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र मोरे, राहुल खोड़से, लुगडे महाराज, राहुल डावकर, राम चव्हाण, छत्रभुज देशमुख, राहुल सुरवसे, विठ्ठल रेपे, दुर्गेश जाधव, पांडुरंग गोंडे, अंकुश इतापूरे, लक्ष्मण काशिद, सुग्रीव कुरे, दत्ता फपाळ, केशव घायतिडक, सचिन अंडील, लहू गवळी, विष्णू डोईफोड़े, सचिन भागवत, परमेश्वर अडागले, कुंडलिक घाडगे, किरण सोलंके यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर आळणे यांनी केले. रमेश मोरे यांनी आभार मानले.