समर्थ रामदास स्वामी रथयात्रा बीडमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 00:26 IST2019-01-18T00:26:13+5:302019-01-18T00:26:40+5:30

राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी रथयात्रा जालना जिल्ह्यातील त्यांच्या जन्मस्थळावरुन किल्ले सज्जनगड येथे दासनवमीनिमित्त जात असते.

Samarth Ramdas Swami Rath Yatra Beed | समर्थ रामदास स्वामी रथयात्रा बीडमध्ये

समर्थ रामदास स्वामी रथयात्रा बीडमध्ये

बीड : राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी रथयात्रा जालना जिल्ह्यातील त्यांच्या जन्मस्थळावरुन किल्ले सज्जनगड येथे दासनवमीनिमित्त जात असते. हा रथ दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी शनिवारी बीड येथील खंडेश्वरी मंदिराजवळ हनुमान मंदिर परिसरात विसावणार आहे. दुसऱ्या दिवशी रविवारी श्री समर्थ रथाचे बीड शहरात स्वागत होणार आहे. यावेळी श्री एकनाथ महाराज पुजारी यांच्या वतीने विठ्ठल मंदिरात समर्थ भक्तांसाठी सेवा होणार आहे. त्यानंतर दुपारी १२.३० वाजता सहयोगनगर मधील गजानन मंदिर येथे आरती व महाप्रसादाचे आयोजन केले आहे. भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन शहरातील समर्थ भक्त व ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी केले आहे.

Web Title: Samarth Ramdas Swami Rath Yatra Beed