शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजनच्या उपलब्धतेसाठी अधिकाऱ्यांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:32 IST

अंबाजोगाई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णांना ऑक्सिजनची नितांत आवश्यकता भासत आहे. सध्या मागणीच्या तुलनेत तुटवडा जाणवत असल्याने ...

अंबाजोगाई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णांना ऑक्सिजनची नितांत आवश्यकता भासत आहे. सध्या मागणीच्या तुलनेत तुटवडा जाणवत असल्याने ऑक्सिजनच्या उपलब्धतेसाठी महसूल व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात धावपळ सुरू आहे. ज्या ठिकाणी ऑक्सिजनचा प्लांट आहे, तेथून अंबाजोगाईला ऑक्सिजन मिळावा, यासाठी महसूलचे अधिकारी तळ ठोकून आहेत.

दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. अंबाजोगाई तालुक्यात फक्त एप्रिल महिन्यात कोरोनाच्या रुग्णांनी साडेचार हजाराचा आकडा पार केला आहे. अंबाजोगाईसह धारूर, परळी, केज, माजलगाव, गंगाखेड, कळंब या ठिकाणांहूनही रुग्ण अंबाजोगाईत उपचारासाठी येतात. अंबाजोगाईच्या स्वामी रामानंदतीर्थ रुग्णालय व लोखंडी सावरगाव येथील कोविड केअर सेंटर अशा दोन ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अंबाजोगाई व लोखंडी सावरगाव या दोन ठिकाणी मिळून ऑक्सिजनचे ४५० बेड आहेत. अजूनही कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने गंभीर व अतिगंभीर रुग्णांना ऑक्सिजनची नितांत आवश्यकता आहे. ऑक्सिजनचे ४५० बेड उपलब्ध आहेत, तरीही या बेडचा तुटवडा निर्माण झाला आहे. या रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी महसूल विभागाची धावपळ सुरू आहे.

अपर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर, स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, उपअधिष्ठाता डॉ. राजेश कचरे, उपजिल्हाधिकारी शरद झाडके, तहसीलदार विपीन पाटील यांच्या अधिपत्याखाली २९ तलाठी व सर्व मंडलाधिकाऱ्यांची २४ तास रुग्णालयात ड्युटी लावण्यात आली आहे. महसूलचे कर्मचारी औरंगाबाद, बीड, जालना, लातूर येथून ऑक्सिजन सिलिंडर भरून आणतात. याशिवाय चाकण, बेल्लारी येथून येणारे लिक्वीड ऑक्सिजन टँकरबाबत समन्वय साधणे, या कामातच महसूलचे कर्मचारी व्यस्त आहेत. २४ तास धावपळ करून अंबाजोगाईतील रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी मोठी मेहनत करून महसूल व आरोग्य विभागाचे कर्मचारी कार्यरत आहेत.