रुमणे मारून शेतकऱ्याचा पाय मोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:24 IST2021-06-25T04:24:20+5:302021-06-25T04:24:20+5:30

केज : उसाची काकरी तोडल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने सहाजणांनी ६५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्यासह त्यांच्या कुटुंबियांना बेदम मारहाण केली. ...

Rumane killed and broke the farmer's leg | रुमणे मारून शेतकऱ्याचा पाय मोडला

रुमणे मारून शेतकऱ्याचा पाय मोडला

केज : उसाची काकरी तोडल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने सहाजणांनी ६५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्यासह त्यांच्या कुटुंबियांना बेदम मारहाण केली. मारहाणीत औताचे रुमणे पायावर मारल्याने त्या शेतकऱ्याचा पाय मोडला. ही घटना १२ जूनरोजी दुपारी केज तालुक्यातील भाटुंबा येथे घडली.

संभाजी छबूराव चौरे (वय ६५, रा. भाटुंबा, ता. केज) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. १२ जूनरोजी शेतात असताना दुपारी १ वाजता संभाजी यांना ‘तुमच्या नातसुनेने आमच्या उसाची काकरी का तोडली’ असा जाब विचारल्याच्या राग आल्याने ऋषिकेश गुंडीबा चौरे, सीताराम वसंत चौरे, ओंकार बळीराम चौरे, शांताराम वसंत चौरे, सुदर्शन गुंडीबा चौरे आणि योगेश सीताराम चौरे या सहाजणांनी संगनमत करून लोखंडी गज, काठीने संभाजी आणि त्यांचा मुलगा, नातू, नातसुनेला बेदम मारहाण केली. या मारहाणीत ऋषिकेशने औताचे रुमणे मारून संभाजी यांचा पाय मोडला. गंभीर जखमी झालेल्या संभाजी यांच्यावर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी संभाजी चौरे यांच्या फिर्यादीवरून या सहा आरोपींवर युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक शिंदे करत आहेत.

Web Title: Rumane killed and broke the farmer's leg