रुईधारूर ग्रामस्थांचे एकावेळी दोन ठिकाणी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:22 IST2021-06-23T04:22:26+5:302021-06-23T04:22:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धारूर : तालुक्यातील रुईधारूर येथील समाजमंदिर शेजारील अतिक्रमण हटवण्यासाठी नागरिकांनी पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषण ...

रुईधारूर ग्रामस्थांचे एकावेळी दोन ठिकाणी आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
धारूर : तालुक्यातील रुईधारूर येथील समाजमंदिर शेजारील अतिक्रमण हटवण्यासाठी नागरिकांनी पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषण करूनही प्रश्न मार्गी न लागल्याने अखेर येथील नागरिकांनी पंचायत समितीसमोर तर महिलांनी ग्रामपंचायतसमोर बेमुदत उपोषण सुरू केले असून अतिक्रमण काढल्याशिवाय हे आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
धारूर तालुक्यातील रुईधारूर येथील समाज मंदिराशेजारी काही व्यक्तींनी अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमण केलेल्या व्यक्तींना ग्रामसेवकाने संबंधित शासनाच्या जागेच्या पीटीआर देखील दिलेल्या आहेत. याकामी ग्रामसेवकाने अर्थपूर्ण व्यवहार करून अतिक्रमणधारकांना पीटीआर दिल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वारंवार ग्रामसेवक तसेच ग्रामपंचायत कार्यालयाला लेखी तक्रार देऊनही कुठल्याही प्रकारचे अतिक्रमण काढले नसल्याने ८ जून रोजी धारूर पंचायत समितीसमोर मोतीराम गायकवाड, भिका गायकवाड, लक्ष्मण गायकवाड, शिवाजी गायकवाड यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यावेळी अश्वासन देऊनही मागणी पूर्ण न झाल्याने संतापलेल्या समाजबांधवांनी सोमवारपासून पंचायत समितीसमोर तर महिलांनी ग्रामपंचायतसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत अतिक्रमण काढले जाणार नाही तसेच बोगस पीटीआर देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत हे दोन्ही ठिकाणचे उपोषण सोडणार नाहीत अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली असून हे उपोषण दुसऱ्या दिवशी सुरूच होते.
===Photopath===
220621\img_20210622_102748.jpg~220621\img_20210622_153134.jpg
===Caption===
रुईधारूर ग्रामपंचायत समोर बसलेले महीला~पंचायत समिती समोर बसलेले रुईधारूरचे पुरूष मंडळी