कपीलधार तीर्थक्षेत्राला ११ कोटी रुपये मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 23:57 IST2019-03-08T23:54:49+5:302019-03-08T23:57:28+5:30

संपूर्ण देशातील आणि बीड जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र कपीलधारसाठी ११ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

Rs 11 crore approved for pilgrimage to Kapiladha | कपीलधार तीर्थक्षेत्राला ११ कोटी रुपये मंजूर

कपीलधार तीर्थक्षेत्राला ११ कोटी रुपये मंजूर

बीड : संपूर्ण देशातील आणि बीड जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र कपीलधारसाठी ११ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
तीर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत कपीलधार तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी मोठ्या निधीची गरज भासत होती. भाविकांची आग्रही मागणी लक्षात घेता तीर्थ क्षेत्र क आणि तीर्थ क्षेत्र ब मधून मोठा निधी मिळाला. या निधीतून मंदिर परिसरातील विविध विकास कामे करण्यात आली. मात्र, उर्वरीत कामांसाठी विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्गापासून ते कपीलधारपर्यंत रस्त्याची कामे, पुलाची कामे तसेच सभापंडप, तटभिंती आणि भक्त निवास यासाठी आणखी निधी पाहिजे होता. त्यानुसार ११ कोटी रुपये मंजूर झाले असून, यास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या कामाबाबत टेंडर प्रक्रिया सुरु होत असून लवकच हे काम मार्गी लागणार आहे.

Web Title: Rs 11 crore approved for pilgrimage to Kapiladha