बँकेत दलालांमार्फत सर्वसामान्यांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:26 IST2021-02-05T08:26:36+5:302021-02-05T08:26:36+5:30
नळ योजनेमुळे हातपंपांकडे दुर्लक्ष अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागातील ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी शासनाच्या वतीने गावोगावी हातपंप बसविण्यात आले. पूर्वी ...

बँकेत दलालांमार्फत सर्वसामान्यांची लूट
नळ योजनेमुळे हातपंपांकडे दुर्लक्ष
अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागातील ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी शासनाच्या वतीने गावोगावी हातपंप बसविण्यात आले. पूर्वी या हातपंपावर संपूर्ण गावाला पाणी मिळत असे. मात्र, आता गावोगावी पाणीपुरवठा योजना झाल्याने हातपंप नादुरुस्त अवस्थेत आहेत. भारनियमनाच्या कालावधीत गावांना हातपंपांचा आधार मिळतो. त्यामुळे नादुरुस्त हातपंप दुरुस्तीची मागणी होत आहे.
दामिनी पथक पुन्हा सुरू करण्याची मागणी
परळी : शहरात कोविडच्या पार्श्वभूमीवर मार्च २०पासून शाळा, महाविद्यालये बंद होती. २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. दहावी, बारावी व महाविद्यालयीन परीक्षा शुल्क भरणे सुरू असून, ग्रामीण भागातूनही मुली शहरात येतात. अशावेळी मुलींना रोडरोमिओ त्रास देतात. अशा घटना शहरात घडत आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी चिडीमार, दामिनी पथक पुन्हा सुरू करण्याची मागणी पालकांमधून होत आहे. जेणेकरून या रोडरोमिओंचा बंदोबस्त होऊन त्यांच्यावर नियंत्रण आणता येईल.
ढगाळ वातावरणाचा आंब्यावरही परिणाम
माजलगाव : काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत आहे. थंडीत पावसाचे वातावरण झाले आहे. याचा परिणाम पिकांवर तर होत आहेच, त्याचबरोबर फळांचा राजा समजल्या जाणाऱ्या आंब्यावरही होत आहे. या वातावरणामुळे बहारात आलेला आंब्याचा मोहोर गळू लागला आहे. त्यामुळे उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता दिसत असून, फळबागायतदार शेतकरी अडचणीत सापडला आहे.