मुर्शदपूरच्या दत्तनगर, औदुंबर नगरात रस्त्यांची वाताहत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:23 IST2021-06-26T04:23:42+5:302021-06-26T04:23:42+5:30

मुर्शदपूर ग्रामपंचायतीअंतर्गत दत्तनगर भागातील १३२ के.व्ही.कडून जाणारा रस्ता तसेच पंचायत समितीच्या समोरील औदुंबर नगरमधील रस्ता अत्यंत खराब झाला असून ...

Roads in Duttnagar, Audumbar town of Murshadpur are windy | मुर्शदपूरच्या दत्तनगर, औदुंबर नगरात रस्त्यांची वाताहत

मुर्शदपूरच्या दत्तनगर, औदुंबर नगरात रस्त्यांची वाताहत

मुर्शदपूर ग्रामपंचायतीअंतर्गत दत्तनगर भागातील १३२ के.व्ही.कडून जाणारा रस्ता तसेच पंचायत समितीच्या समोरील औदुंबर नगरमधील रस्ता अत्यंत खराब झाला असून पावसाचे पाणी या रस्त्यावर पडल्यानंतर सर्वत्र या रस्त्यावर खड्डे असल्याने डबकी साचत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूने नालीची कुठलीही सोय नसल्याने पडणाऱ्या पावसाचे पाणी रस्त्यावर साचत आहे. ये-जा करणारे वाहनचालक घसरून पडल्याच्या घटना घडत आहेत. पावसाची रिमझिम झाली तरी, या भागात जाताना तारेवरची कसरत करावी लागते. मागील अनेक दिवसांपासून या रस्त्याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याचे वास्तव दिसून येत आहे.

या भागातील नागरिकांनी प्लॉट खरेदी करून घेतले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीअंतर्गत हे रस्ते येत नाहीत. या नागरिकांचे मतदानही येथे नाही. आपापल्या गावी आहे. त्यामुळे आम्ही रस्ता कसा करावा, असे उत्तर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांकडून मिळत आहे. तात्काळ हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी होत आहे. तसेच या रस्त्याच्या प्रकरणात आ. सुरेश धस यांनी स्वतः लक्ष घालून मुर्शदपूरच्या दत्तनगर व औदुंबर नगर भागातील रस्ते सिमेंटचे करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी प्रतिक्रिया या भागातील नागरिक व्यक्त करत आहेत.

===Photopath===

250621\25bed_5_25062021_14.jpg

Web Title: Roads in Duttnagar, Audumbar town of Murshadpur are windy