विशेष रस्ता अनुदान योजनेंर्गत बीड शहरात रस्त्याची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:30 IST2021-03-08T04:30:57+5:302021-03-08T04:30:57+5:30
बीड शहरात येणाऱ्या काळात दर्जेदार रस्ते करुन विकास करण्याचा मानस आ. विनायक मेटे यांच्या संकल्पनेतून शिवसंग्राम करणार आहे. त्याचबरोबर ...

विशेष रस्ता अनुदान योजनेंर्गत बीड शहरात रस्त्याची कामे
बीड शहरात येणाऱ्या काळात दर्जेदार रस्ते करुन विकास करण्याचा मानस आ. विनायक मेटे यांच्या संकल्पनेतून शिवसंग्राम करणार आहे. त्याचबरोबर येणाऱ्या काळात शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन विकास कामे केली जाणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून विविध विकासकामे नगरपरिषदेच्या हलगर्जीपणामुळे रखडलेले आहेत. त्यामुळे आता शिवसंग्रामच्या माध्यमातून शहरामध्ये विकासकामे करण्याचा विडा शिवसंग्रामने उचलला असल्याचे यावेळी रामहरी मेटे यांनी सांगितले.
यावेळी शिवसंग्रामचे सुधीर काकडे, अनिल घुमरे, सुहास पाटील, ॲड.राहुल मस्के, विनोद कवडे, मीरा डावकर, ज्ञानेश्वर कोकाटे, नवनाथ प्रभाळे, सुनील शिंदे आदी उपस्थित होते. स्नेहनगर भागातील चंद्रकांत देवळे, पद्माकर कुलकर्णी, रतन सवाई, प्रसाद कांबळे, विजय चव्हाण आदी उपस्थित होते.
===Photopath===
070321\07bed_6_07032021_14.jpg
===Caption===
सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकामाचे भूमीपूजन रामहरी मेटे यांच्या हस्ते करण्यात आले.