गौंडगावकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:49 IST2021-01-08T05:49:08+5:302021-01-08T05:49:08+5:30
गेवराई : गेवराई ते पांढरवाडी रोडपासून गौंडगावकडे जाणाचा चार किलोमीटरचा रस्ता डांबरी, खडीकरण करून अर्धवट सोडून दिल्याने ...

गौंडगावकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम रखडले
गेवराई : गेवराई ते पांढरवाडी रोडपासून गौंडगावकडे जाणाचा चार किलोमीटरचा रस्ता डांबरी, खडीकरण करून अर्धवट सोडून दिल्याने हा रस्ता पूर्ण होण्याआधीच जागोजागी उखडला आहे. या बोगस कामाची चौकशी करून त्वरित चांगले काम करून रस्ता पूर्ण करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
तालुक्यातील गेवराई ते पांढरवाडी रोडपासून गौंडगावकडे जाणारा ४ कि.मी. अंतराचा रस्ता अत्यंत खराब झाला होता. हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रशासनाकडे केली होती. त्यानंतर या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत १ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून काम सुरू असून यात मुरूम, खडी व डांबर टाकण्यात आले. मात्र, टाकलेली खडी जागोजागी उखडली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्यावर बारीक खडी व डांबराचा कोट अद्याप टाकला नसल्याने हे काम एवढ्यावरच उरकण्याचा प्रयत्न आहे की काय, असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत. या कामाची चौकशी करून राहिलेले काम चांगले व त्वरित सुरू करावे, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
( चौकट )
या रस्त्यासाठी गावातील नागरिक प्रशासनाकडे अनेक वर्षांपासून झगडत होते. रस्ता मंजूर झाला. मात्र, काम बोगस होत असून, चौकशी करावी, तसेच हे काम दर्जेदार व पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.