आदर्शनगरातील रस्त्याची दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:03 IST2021-02-06T05:03:44+5:302021-02-06T05:03:44+5:30
बसस्थानकाचे काम गतीने होईना बीड : बीड बसस्थानक, आगाराचे बांधकाम सध्या केले जात आहे; परंतु लॉकडाऊनमुळे हे काम ...

आदर्शनगरातील रस्त्याची दुरुस्ती
बसस्थानकाचे काम गतीने होईना
बीड : बीड बसस्थानक, आगाराचे बांधकाम सध्या केले जात आहे; परंतु लॉकडाऊनमुळे हे काम बंद पडले होते. आता बांधकामास परवानगी देण्यात आली आहे. सध्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हे काम गतीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे. परंतु अद्यापही या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. बसस्थानकात खड्डेच खड्डे असल्याने प्रवाशांना याचा त्रास होत आहे.
आरटीओ कार्यालयात एजंटांची गर्दी
बीड : येथील आरटीओ कार्यालयात सध्या एजंटांची पुन्हा गर्दी वाढू लागली आहे. परवाना व इतर कागदपत्रे काढण्यासाठी हे एजंट लोक पैशांची मागणी करून सामान्यांची आर्थिक लूट करत असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, सामान्यांच्या कामांकडे दुर्लक्ष करून एजंटांच्या कामाला येथील अधिकारीही प्राधान्य देत आहेत. यामुळे अनेकांची कामे होत नाहीत. यामुळे सर्वसामान्यांना हेलपाटे मारून त्रस्त व्हावे लागत आहे.