आदर्शनगरातील रस्त्याची दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:35 IST2021-01-19T04:35:16+5:302021-01-19T04:35:16+5:30
बसस्थानकाचे काम गतीने होईना बीड : बीड बसस्थानक, आगाराचे बांधकाम सध्या केले जात आहे; परंतु लॉकडाऊनमुळे हे काम बंद ...

आदर्शनगरातील रस्त्याची दुरुस्ती
बसस्थानकाचे
काम गतीने होईना
बीड : बीड बसस्थानक, आगाराचे बांधकाम सध्या केले जात आहे; परंतु लॉकडाऊनमुळे हे काम बंद पडले होते. आता बांधकामास परवानगी देण्यात आली आहे. सध्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हे काम गतीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे. परंतु अद्यापही या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
नेकनूर-पोथरा
रस्त्याची दुरवस्था
बीड : तालुक्यातील नेकनूर ते पोथरा या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. नेकनूर हे आठवडी बाजाराचे गाव असल्यामुळे रहदारी जास्त असते. मात्र, मागील अनेक महिन्यांपासून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांचे व नागरिकांचे हाल होत आहेत. म्हणून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. या संदर्भात वेळोवेळी प्रशासनास निवेदन देऊनही दुर्लक्ष होत आहे.
अवैध प्रवासी
वाहतूक वाढली
बीड : शहरातील साठे चौक, नगर नाका, बार्शी नाका, मोंढा रोड भागांत सध्या खासगी वाहनांमधून सर्रासपणे अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविले जात असल्याने अपघातास निमंत्रण मिळत आहे. यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी आहे.