गेवराईच्या राजगल्ली भागात रस्त्याला तळ्याचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:22 IST2021-06-29T04:22:51+5:302021-06-29T04:22:51+5:30

शहरात व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यानंतर रविवारी सायंकाळी ६ च्या नंतर तालुक्यात सह शहरात जोरदार हजेरी ...

Road in the Rajgalli area of Gevrai looks like a pond | गेवराईच्या राजगल्ली भागात रस्त्याला तळ्याचे स्वरूप

गेवराईच्या राजगल्ली भागात रस्त्याला तळ्याचे स्वरूप

शहरात व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यानंतर रविवारी सायंकाळी ६ च्या नंतर तालुक्यात सह शहरात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शहरातील राज गल्ली भागातील रस्त्याला अक्षरश: तळ्याचे स्वरूप आले होते. कारण या भागातील नाल्यांचे काम गेल्या अनेक वर्षांपासून झालेले नाही. एरव्हीदेखील नाल्यांचे पाणी रस्त्यावर येते. नाल्या कराव्यात या मागणीसाठी या भागातील नागरिकांनी अनेक वेळा नगरपरिषदेला लेखी अर्जाद्वारे कळविले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी रविवारी झालेल्या जोरदार पावसाने रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले होते. या भागातील नाल्या नव्याने कराव्यात व नाल्याची साफसफाई नेहमी करावी, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शेख एजाज यांनी केली आहे.

===Photopath===

280621\sakharam shinde_img-20210627-wa0047_14.jpg~280621\sakharam shinde_img-20210627-wa0045_14.jpg

Web Title: Road in the Rajgalli area of Gevrai looks like a pond