रस्त्याची दुरवस्था, नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:29 IST2021-04-05T04:29:34+5:302021-04-05T04:29:34+5:30
सुजाण नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे बीड : राज्यात कोरोनाच्या उद्रेकाचा परिणाम थेट रक्ताच्या साठ्यावर झाला असून केवळ पाच ते ...

रस्त्याची दुरवस्था, नागरिक त्रस्त
सुजाण नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे
बीड : राज्यात कोरोनाच्या उद्रेकाचा परिणाम थेट रक्ताच्या साठ्यावर झाला असून केवळ पाच ते सहा दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. सुजाण नागरिकांनी तसेच रक्तदानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी अधिकाधिक कार्य करून रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन क्रीडा शिक्षक राहुल मोरे यांनी केले आहे.
लोंबकळणाऱ्या तारांचे अपघातास निमंत्रण
बीड : शहरातील पांगरी रोड, सहयोगनगर, स्वराज्यनगर, बार्शीनाका, नगरनाका, एमआयडीसी परिसराला वीजपुरवठा करणाऱ्या तारा लोंबकळल्या आहेत. अनेकांच्या घरावरून, तर काहींच्या घरासमोरून या तारा गेल्या आहेत. यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
ग्रामीण भागात पथदिव्यांचा अभाव
अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागात असणारे बहुतांश पथदिवे बंद स्थितीत राहतात. परिणामी चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बंद पथदिवे व वीजपुरवठा पूर्ववत सुरू करून ग्रामीण भागातील ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.