उघड्या रोहित्रामुळे अपघाताचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:21 IST2021-07-12T04:21:40+5:302021-07-12T04:21:40+5:30
तालखेड परिसरातील रस्ते दुरुस्तीची मागणी माजलगाव : तालुक्यातील तालखेड रस्ता व ग्रामीण भागात जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहतुकीला अडथळे ...

उघड्या रोहित्रामुळे अपघाताचा धोका
तालखेड परिसरातील रस्ते दुरुस्तीची मागणी
माजलगाव : तालुक्यातील तालखेड रस्ता व ग्रामीण भागात जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहतुकीला अडथळे येत आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणी बाभळीच्या झाडांमुळे वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने वाहन चालविताना चालकांना कसरत करावी लागत आहे. तसेच गावातून शेतात जाणारे शेतकरी, ग्रामस्थही खराब रस्त्यामुळे त्रस्त झाले आहेत.
बँकेत ग्राहकांची गर्दीच गर्दी
बीड : शहरात बँकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. राष्ट्रीयीकृत बँका, नागरी बँका, पतसंस्था, मल्टिस्टेट, या सर्वच ठिकाणी ग्राहक गर्दी करू लागले आहेत. अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. अशी स्थिती असतानाही मास्कचा वापर न करणे. सामाजिक अंतर न पाळणे, या नियमांचे सातत्याने उल्लंघन होत आहे. ग्राहकांकडून होणाऱ्या या दुर्लक्षाकडे बँक प्रशासनाने खबरदारी पाळण्याचे आवाहन केले आहे.